आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेत आयुष्यभर सेवा बजावलेल्या १२४५ निवृत्तांच्या घरासाठी अानंदाचे वृत्त अाहे. सात वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या व काेणताही अाक्षेप नसलेल्या या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाचा मे महिन्यापासून प्रत्यक्ष लाभ देण्यात अाला अाहे.
प्रत्येकाच्या पेन्शनमध्ये २ ते ४ हजारांची वाढ झाली असून, मनपाच्या तिजाेरीवर ३५ लाखांचा भार पडला अाहे. याशिवाय जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या अाणखी २४० जणांना सातव्या वेतनाचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली अाहे. त्यामुळे शहरात सेवासुविधांमुळे चांगले दिवस मिळाे न मिळाे, शहरात राहणाऱ्या मनपाच्या सेवानिवृत्तांसाठी मात्र ‘अच्छे दिन’ सुरू झाले हे नक्की अाहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला अाहे. नगरपालिका असताना १९९२ ते १९९७ दरम्यान झालेल्या कर्मचारी भरतीसंदर्भात लेखा परीक्षणात अाक्षेप नाेंदवण्यात अाले अाहेत. यात ११८७ कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व पदाेन्नतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहेत. त्यामुळे मनपाचे कार्यरत व सेवानिवृत्त सर्वच कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून सातव्या वेतनापासून वंचित राहिले हाेते.
दरम्यान, गेल्या वर्षी अाॅगस्ट २०२२ पासून लेखापरीक्षणात नाव नसलेल्या ९४८ जणांना सातव्या वेतनाचा लाभ देण्यास सुरुवात केली हाेती. मनपात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपाठाेपाठ सेवानिवृत्तांसंदर्भा त मनपाने सकारात्मक पाऊल टाकले अाहे. त्यात १ जानेवारी २०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सुमारे १२४५ कर्मचाऱ्यांनाही विशेष लेखापरीक्षणात नाव नसल्यामुळे सातव्या वेतनाचा लाभ दिला अाहे.
या सेवानिवृत्तांच्या बेसिकनुसार त्यांच्या पेन्शनमध्ये दाेन ते चार हजार रुपये वाढ झाल्याचे मनपातर्फे सांगण्यात अाले.
1187 जणांचे भवितव्य शासन ठरवेल
नगरपालिका असताना झालेल्या कर्मचारी भरतीत नियमांना तिलांजली देत नियुक्ती केल्याचा ठपका अाहे. १९९२ ते १९९७ दरम्यानच्या ११८७ अाजी, माजी कर्मचाऱ्यांवर विशेष लेखापरीक्षणात ठपका अाहे. ११८७ पैकी सुमारे ५५० कर्मचारी सेवानिवृत्त झाले अाहेत. या सर्व कर्मचाऱ्यांवर अाक्षेप असल्याने सातवा वेतन अायाेग लागू केलेला नाही. त्यांच्यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शन मागवले अाहे. अनुपालन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ हाेणार अाहे.
प्रशासकीय इमारत, ग्रंथालय व परीक्षा विभाग ही इमारत तळमजला अधिक तीन मजले असेल. विद्यार्थ्यांसाठी १४२ क्षमतेचे दाेन व १०६ क्षमतेचे एक वसतिगृह, विद्यार्थिनींसाठी १४२ क्षतमेचे २ वसतिगृहांच्या प्रत्येकी तळमजला अधिक दाेन मजली इमारती असतील.
सात तळमजल्याच्या इमारती उभारल्या जाणार अाहेत. त्यात दाेन डायनिंग हाॅल, दाेन सेवा कक्ष, गॅस मॅनिफाेल्ड, वेस्ट मॅनेजमेंट कक्ष, शवागार, इनडाेअर स्पाेर्ट्स संकुल याचा त्यात समावेश असेल. त्यानुसार नियाेजन करण्यात अाले अाहे.
महापालिकेत १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्तीचे प्रमाण वाढले अाहे. २०१६ ते २०२३ दरम्यान अातापर्यंत सुमारे ४३९ कर्मचारी सेवानिवृत्त झाले अाहेत. यातील अाक्षेप नसलेल्या २४० निवृत्तांना सातव्या वेतनाचा लाभ देण्यासंदर्भात अास्थापना विभागात काम सुरू अाहे. येत्या दाेन महिन्यात या सेवानिवृत्तांच्या पेन्शनमध्ये २ ते ४ हजारांची वाढ झालेली दिसेल.
वेतनाच्या खर्चाचेही नियाेजन
मनपा कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन वाढीमुळे तिजाेरीवर अार्थिक भार पडणार अाहे. दर महिन्याला सुमारे दाेन काेटी रुपये वाढ शक्य अाहे. दरम्यान मनपावर काेणत्याही प्रकारचे कर्ज नाही. तसेच कर्जापाेटी शासनाला वळवण्यात येणारे तीन काेटी रुपये देखील मनपाला प्राप्त हाेणार अाहेत. त्यामुळे सातव्या वेतनाचा अागामी काळात वाढणारा भार हलका हाेणार अाहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.