आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधू-वर परिचय मेळावा‎:थोरगव्हाणला देवदांडा‎ मिरवणुकीचा जल्लाेष‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावदा येथून जवळच असलेल्या‎ थोरगव्हाण येथे भैरवनाथांचा‎ यात्रेनिमित्त शनिवारी १०० फुटी देव‎ दांड्याची मिरवणूक निघाली.‎ गावाच्या प्रमुख मार्गांवरून ही‎ मिरवणूक मार्गस्थ झाली.‎ तरुणांच्या उत्साहात गावातील‎ भाविकांच्या उपस्थितीत पारंपारिक‎ वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक‎ निघाली. तरुण भाविक देवदंडा‎ तोंडात, हाताच्या तळव्यावर घेऊन‎ नाचत होते. मिरवणुकीत तीन‎ देवदांडे घेऊन भक्त सहभागी झाले.‎ यावेळी परिसरातील भगत ही‎ उपस्थित होते. रविवारी सकाळी‎ भैरवनाथ महाराजांचा चांदीच्या‎ मुकूट व सोन्याच्या दागिन्यांसह‎ मिरवणूक काढण्यात आली.

या‎ मिरवणुकीत मंदिराचे विश्वस्त व‎ पोलीस पाटील अरविंद झोपे, सरपंच‎ उपस्थित होते. दुपारी ११ वाजता‎ मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते मूर्तीला‎ चांदीचा मुकुट व दागिने परिधान‎ करण्यात आले. त्यानंतर सामूहिक‎ आरती करण्यात आली. त्यानंतर‎ मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात‎ आले. यात्रेच्या पहिल्या दिवशी‎ चतुर्दशीला थोर सन्मित्र मित्र‎ मंडळातर्फे लेवा पाटीदार समाजाचा‎ वधू वर मेळावा होतो. या निमित्ताने‎ समाजबांधव एकत्र येऊन नातेसंबध‎ दृढ हाेण्यासाठी त्याचा फायदा हाेताे.‎

बातम्या आणखी आहेत...