आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जळगाव:जिथे कपड्याने गाळून चिखलाचे पाणी पीत होते तिथे आता पिकताहेत मासे

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जांभाेरा तलाव जुलैतच भरला सुमारे 90 टक्के

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील जांभाेरा गावाशेजारी पाझर तलाव आहे. मे २०१९मध्ये ताे आटला हाेता. इवल्याशा डबक्यात साचलेले पाणी कपड्याने गाळून परिसराचे गावकरी तहान भागवत हाेते. त्यानंतर गेल्या पावसाळ्यात या तलावात आॅगस्टअखेर साठा वाढला, पण ताे पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. यंदा जुलैत झालेल्या दमदार पावसाने हा तलाव ९० टक्के भरला आहे. जिथे कपड्याने गाळून चिखलाचे पाणी प्यावे लागत हाेते, तिथे आता पाण्यातून मासे पिकताहेत. जांभाेरा भागातील शेकडाे कुटुंबांना तलावाच्या ‘जलश्रीमंती’ने मासेमारी व्यवसायातून पाेट भरण्याचे साधन मिळाले आहे. तलावाच्या आजूबाजूला १३ गावे आहेत. शेतीशिवारातील विहिरी व कूपनलिकांचा प्रमुख जलस्राेत हाच तलाव आहे. खालावत गेलेली भूजलपातळी तलाव जसजता भरताे आहे, तसतशी वाढते आहे. आणखी एक ते दाेनदा मुसळधार पाऊस झाला तर हा तलाव १०० टक्के भरून वर्षभराची चिंता मिटेल.