आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारविवारी झेलम, गोवा, काशी एक्स्प्रेस तीन तास, बरेली-लोकमान्य टिळक साडेतीन तास तर सचखंड एक्स्प्रेस तब्बल ५ तास ५० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. ताप्तीगंगा व चेन्नई-जोधपूर या गाड्या वळवण्यात आल्या. घरून निघताना गाड्यांचे लोकेशन न पाहिल्याने व स्थानकात आल्यावर गाड्या उशिराने धावत असल्याचे कळाल्याने स्थानिक प्रवाशांनी स्टेशनातून काढता पाय घेतला.
अनेकांनी स्थानकातच वेळ काढत रेल्वेच्या नियोजनाबाबत बोटे मोडली. जळगावातून संपूर्ण भारतभर सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेची ओळख आहे. लांबचा प्रवास करणारे असंख्य प्रवासी रेल्वेला पसंती देतात. मात्र, रविवारी तब्बल ६ गाड्या दीड तासापासून ते ५ तास ५० मिनिटांपर्यंत उशिराने धावत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आरक्षण असलेल्या प्रवाशांचे हाल झाले.
या गाड्या उशिराने
गाडी क्र. ११०७८ जम्मूतवी-पुणे (झेलम) ३ तास, गाडी क्र. १२७८० हजरत निजामोद्दीन-वास्को (गोवा) ३ तास, गाडी क्र. १५०१८ गोरखपूर-लोकमान्य टिळक (काशी) ३ तास, गाडी क्र. १४३१५ बरेली-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस ३.३० तास, गाडी क्र. १२७१६ अमृतसर-नांदेड (सचखंड) ५ तास ५० मिनिटे, तर गाडी क्र. १२१६२ आग्राकॅन्ट-लोकमान्य टिळक (लष्कर) १.३० मिनिटे उशिराने धावत आहे. तर १९०४६ छपरा-सुरत ताप्ती गंगा व गाडी क्र. २२६६३ चेन्नई-जोधपूर या गाड्यांचा मार्ग वळवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.