आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कांगारू मदर केअरमुळे जिल्ह्यात बालकांचा मृत्यूदर घटला, उपक्रमात जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शासकीय रुग्णालयात 80% बालकांना दिली जातेय सेवा

मुदतपूर्व प्रसूती झालेल्या व आकाराने लहान बाळांना पुरेशा वाढीसाठी ऊब, आईच्या दुधाच्या माध्यमातून पोषक आहार आणि स्वच्छता यांची आवश्यकता असते. इन्क्युबेटरमध्ये असलेल्या बाळांना सामान्य होण्यास विलंब लागतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू वॉर्डात दाखल असलेल्या ८० टक्के बालकांना कांगारू मदर केअर अर्थात (केएमसी) दिली जात आहे. यामुळे नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. आहे. या उपक्रमात जळगाव जिल्हा हा राज्यात अव्वल ठरला आहे.

जिल्ह्यात २.५ किलोपेक्षा कमी वजनाचे व ९ महिन्यांपूर्वी जन्म झालेल्या नवजात अर्भकांचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत ९ महिन्यांपूर्वी झालेल्या बाळांसाठी कांगारू मदर केअर ही नवजात शिशू कक्षातून डिस्चार्ज झाल्यावर घरच्या घरी ही नैसर्गिक पद्धत वरदान ठरू शकते. एसएनसीयू विभागात मातांना व त्यांच्या कुटुंबीयांना प्रशिक्षण दिले जात आहे. या पद्धतीत बाळाला एका विशिष्ट पिशवीत, बाळाचे शरीर दोन स्तनांमध्ये येईल व पाय पिशवीतून दोन्ही बाजूला ठेवता येतील अशा पद्धतीने ठेवले जाते. पिशवी बंधाने आई किंवा वडिलांच्या गळ्याच्या व पाठीमागे बांधण्यात येते. कांगारू ज्या प्रकारे बाळाला छातीशी ठेवते, तसेच ठेवता येते.

केएमसीचे पालकांसाठीचे फायदे
बाळाशी भावनिक नाते वाढते, आईच्या संगोपनाविषयी आत्मविश्वास वाढतो, दूध देण्याचे प्रमाण वाढते व स्तनपान अधिक प्रभावीपणे होते, काम करतानाही कांगारू संगोपन देता येते, वडिलांचा संगोपनातील सहभाग वाढतो, आधुनिक वैद्यकीय उपचार खर्चीक व केवळ तंत्रज्ञानाधिष्ठित होत असताना ही पद्धत स्वस्त पद्धत जास्त प्रमाणात अंगीकारली जावी. या संदर्भात जीएमसीत प्रशिक्षणही दिली जाते आहे.

केएमसीचे बाळासाठीचे फायदे : आईच्या गर्भात असल्यासारखे वातावरण व सतत आईच्या हृदयाचे ठोके ऐकायला येत असल्याने बाळाला अधिक सुरक्षित वाटते, बाळाच्या त्वचेचे तापमान १ डिग्रीने कमी झाले की लगेचच आईच्या त्वचेचे तापमान १ डिग्रीने वाढते व नैसर्गिकरीत्या तापमान नियंत्रित राहते, सतत स्तनांमध्ये राहिल्याने स्तनपानाचे प्रमाण वाढते, गरज असेल तेव्हा स्तनपान करता येते.

या तीन परिस्थितींमध्ये होतो वापर
{ज्या ठिकाणी प्रत्येक प्रकारची निओनॅटल केअर उपलब्ध आहे तेथे आई व बाळामध्ये दृढ नाते तयार होते.
{जन्मजात कमी वजन असलेल्या मुदतपूर्व प्रसूती झालेल्या बाळांसाठी ही पद्धत प्रामुख्याने वापरली जाते.
{नवजात बालकांच्या शुश्रूषेसाठी सुविधा नाहीत तेथे इन्क्युबेटर्स कमतरता केएमसीने भरून निघते.

महिन्याला दीडशे बालकांना सेवा
केएमसीत बाळाला होणारा स्पर्श, नाजूक बाळांचे वजन वाढेपर्यंत या बाळांना रात्रंदिवस आईच्या स्तनांत उभ्या स्थितीत घट्ट कवटाळून ठेवले जाते. - डॉ. शैलजा चव्हाण, इन्चार्ज

बातम्या आणखी आहेत...