आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा!:कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत मुलांना घवघवीश यश; स्पर्धेत 3 विद्यार्थी प्रथम

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कांताई यांच्या श्रध्दावंदन दिनानिमित्त मंगळवारी (06 सप्टेंबर) भवरलालजी जैन यांच्या जन्मगावी वाकोद येथे राज्यस्तरीय कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा-2022 चे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा इयत्ता 5 वी ते 7 वी, 8 वी ते 10 आणि 11 वी ते 12 वी या तिन गटात झाली. यामध्ये रणवीर साळुंखे, सृष्टी कुळकर्णी, वेदांत चौधरी हे पहिले आले.

आ.ग.र.ग.माध्यमिक विद्यालयाचा अर्थव तुषार पाटील, नागलवाडीचे माध्यमिक विद्यालयाची मुग्धा विजय याज्ञिक, 8 वी ते 10 गटात जळगाव ए. टी. झांबरे विद्यालयाची सृष्टी विशाल कुळकर्णी प्रथम, चुंचाळे येथील नुतन माध्यमिक विद्यालयाचे रोशनी देविदास पाटील द्वितीय, पळसखेडे येथील नि.प. पाटील मा.विद्यालयाचा सुमित दिपक खैरे तृतिय, 11 वी ते 12 वी या गटात प्रथम चोपडाचे पंकज माध्यमिक विद्यालय वेदांत पांडुरंग चौधरी, द्वितीय वाकोदच्या राणीदान जैन माध्यमिक विद्यालय व शेंदुर्णीचे आ. रघुनाथराव गरूड महाविद्यालयचे प्रिती समाधान मोहिते व दिव्या संतोष चौधरी, तृतीय क्रमांक राष्ट्रीय कन्या शाळा ज्युनिअर लेज रेणुका सिताराम सानप विजयी झाले.

दी.शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि.शेंदुर्णी संचलित राणिदानजी जैन माध्यमिक विद्यालय व कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय वाकोद यांच्यातर्फे आयोजित व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. सकाळी दीपप्रज्वलनाने औपचारिक उद्घाटन झाले.

मुख्य पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार संपादक हेमंत अलोणे,कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिष काशिद, जैन इरिगेशनचे मिडीया विभागाचे प्रमुख अनिल जोशी, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंग राजपूत, पोलीस पाटील संतोष देठे, पांडुरंग पाटील, यू. यू. पाटील, ए. टी. चौधरी, ए. ए. पटेल उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ज्ञानयोगी आचार्य हे पुस्तक प्रकाशन झाले. स्वागतगिताने व दीपप्रज्वलन माल्यार्पण करून पारितोषिक वितरण सोहळाची सुरूवात झाली. एस. टी. चिंचोले यांनी प्रास्तविक केले.

देवदत्त गोखले यांनी परीक्षकांच्यावतीने मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार हेमंत अलोणे यांनी कांताईंच्या स्मृतींना अभिवादन करीत आपल्या मनोगताला सुरुवात केली. दिलेला विषय, विषयाची मांडणी करणं, हातवारे आणि हावभाव करणे यातुन समाधिटपणा दिसुन आल्याचे सांगत वाकोद या मातीचा वक्तृत्व-कर्तृत्व उंचविणारे गुण आहे याची अनुभूती प्रत्यक्ष आली. शेंदुर्णी संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष सतिष काशिद यांनी मनोगत व्यक्त केले. परीक्षक म्हणून देवदत्त गोखाले, देवेंद्र पाटील, एस. व्ही. भोळे, प्रशांत देशमुख, भुषण पाटील, गणेश राऊत, अतुल पाटील यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...