आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय एकात्मता वाढावी, विश्वशांती आणि पर्जन्यराजाची कृपादृष्टी व्हावी या उद्देशाने प्रतापनगरातील दिंडोरी प्रणित श्रीस्वामी समर्थ केंद्रात सुरू असलेल्या श्री गुरुचरित्र पारायणात दररोज पाचशे पेक्षा अधिक महिला सहभागी होत आहे.
यात भारतीय धार्मीक संस्कृतीचे दर्शन घडत असून पौरोहित्यही महिलाच करीत आहेत. सोमवारीही नित्यस्वाहाकार होवून स्वामी याग करण्यात आला. बुधवारी दत्तजंयती महोत्सव साजरा होणार असून गुरूवारी श्रीसत्यदत्त पूजन, देवता विर्सजन होऊन अखंड नामम जप यज्ञ सप्ताहाचा समारोप होणार आहे.
श्रीदत्त जयंती निमित्त याग सप्ताहाला गुरुवार पासून सुरुवात झाली आहे. यामुळे मंदीर परिसर भाविकांनी गजबजले आहे. दिवसभरात भूपाळी आरती, गुरुचरित्र वाचन, विशेष याग, दुर्गासप्तशती, औदुंबर प्रदक्षिणा, नैवद्य आरतीसह विविध विषयांवर मार्गदर्शन व नित्यसेवा नित्यध्यान आदी धार्मीक कार्यक्रमांची रेलचेल दत्तजयंती उत्सवामुळे स्वामीसमर्थ मंदीरात सुरू आहे.
दररोज सात ते अकरा यावेळेत केंद्रात दररोज एकाचवेळी सुमारे 500 महिला दररोज गुरुचरित्र पारायणासह होमहवनामध्येही सहभाग घेत आहेत. सुरुवातीला महोत्सव निर्वीघ्नपणे पार पाडण्यासाठी ग्रामदेवतेला निमंत्रण देवून मंडल मांडणी करून आराधना करण्यात आली. यासह मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन यातून भगवंताला साकडे घालण्यात आले. मंदिराचे विश्वस्त बी.एम.पाटील, सेवेकरी नविन भावसार, याज्ञिकी कैलास वाणी, अतुल कासार, गोपाळ तायडे, सोनाली पाटील यांनी नियोजन केले.
मंदीरात दररोज सकाळी सात ते सायंकाळी व पुन्हा सायंकाळी 7.00 ते सकाळी 7.00 यापद्धतीने श्रद्धाळू महिला व पुरूष भाविक अखंड माळ जपासह स्वामी चरित्र वाचन करीत आहेत. उत्सवात मुलांच्या बुद्धीची प्रगती व्हावी यासाठी बालकांचा गणेश याग, मनाची विचलता कमी व्हावी यासाठी मनोबोध याग तर ज्ञानप्राप्तीसाठी गीताई याग यासह आई भगवतेची सेवा व्हावी यासाठी चंडी याग या विधीचे उत्कृष्ठपणे आयोजन करण्यात आले. तर सोमवारी स्वामी याग मध्ये चरित्र पठणकर्त्यां व्यतिरिक्त शेकडो भाविक सहभागी झालेत. अर्थवशीर्षाचे 21 आर्वतने, मोदक, लाह्या, दुर्गा वाहून 700 श्लोक दुर्गासप्तशतीचे पठण करण्यात आले. यावेळी या धार्मीक उपक्रमात भाविकांच्या भक्तीचा प्रचंड उत्साह दिसून आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.