आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या सूचना:महाविद्यालयांनी प्रोत्साहनपर गुणलाभ याद्या 15 जूनपर्यंत ई-पद्धतीने सादर कराव्या

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत संलग्नित महाविद्यालये व मान्यता प्राप्त परिसंस्था यांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अध्यादेश 163 व अध्यादेश रक्तदान अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर गुणांच्या याद्या व हमीपत्र ई-पद्धतीने सादर करावे अशा सूचना विद्यापीठातर्फे देण्यात आल्या आहे.

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राष्ट्रीय छात्र सेना व आंतर विद्यापीठ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विद्यापीठ कलावंत म्हणून सहभाग नोंदवून उल्लेखनीय कार्य केलेले कलावंत विद्यार्थी यांना विद्यापीठ अध्यादेश 163 अन्वये 10 गुण व 1 सप्टेंबर 2021 ते 31 जानेवारी 2022 या दरम्यान रक्तदान केले असल्यास त्यांना विद्यापीठ अध्यादेश रक्तदान तरतुदीनुसार 2 गुण देण्यात यावे. यानुसार संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणयाद्या तयार करून त्या ई-पद्धतीने सादर कराव्या. या याद्या एमकेसीएलने तयार केलेल्या एडीईएस सॉफ्टवेअरमध्ये भरावयाच्या आहे.यात तयार केलेल्या गुण याद्यांची प्रीत अचूक असल्याची खात्री प्राध्यापकांनी करावी. काही दुरुस्ती असल्यास अशा दुरुस्त्या सॉफ्टवेअरमध्ये कराव्या. सबमिट डाटा विद्यापीठाच्या लिंकवर क्लिक करून विद्यापीठास ऑनलाईन पाठवावा. दरम्यान ऑनलाईन डाटा 15 जूनपर्यंत सबमिट करावयाचा असून विद्यापीठात हार्ड कॉपी 15 ते 25 जून दरम्यान जमा करावी असा सूचना देण्यात आल्या आहे.

बातम्या आणखी आहेत...