आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतील जीवनावर असंख्य चित्रपट, नाटकं प्रदर्शित झाली आहेत. मुंबईतील मध्यमवर्गीयांचे जीवन हे कसे खडतर आहे, पांढरपेशा, सरळमार्गी माणूस आपल्याच फ्लॅटमध्ये कसा विस्थापित हाेताे याची विदिर्ण कथा माेठ्या संवेदनशीलतेने जयंत पवार ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकात मांडतात. नाटकाचा फाॅर्म देखील आधुनिक आणि सामूहिक असाच. सूत्रधारच्या स्वरूपातून कथासूत्र उलगडत जाते आणि समूहाच्या माध्यमातून प्रसंग खुलवतात. साेनल चाैधरी यांचा सूत्रधार सुरुवातीला काहीसा भांबावल्यासारखा वाटला; परंतु त्यांनी स्वत:ला सावरत नाटकाचा ताेल सांभाळतात. सत्यविजय नरहरी दाभाडेची गाेष्ट माेठ्या खुबीने ते सांगतात. आणि दाभाडेच्या जीवनातील प्रसंग प्रेक्षकांसमाेर मांडले जातात. सामान्य माणसांना पिळवटून काढून त्याच्या जमिनी बळकावून विस्थापित करून बिल्डर संस्कृती माेठ्या इमारती बांधणार. आणि अवाॅर्ड समारंभामध्ये संभावितपणे पारिताेषिकं स्वीकारणार. ही विसंगती आणि सरळमार्गी, पापभिरू माणसांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन बिल्डर जमात निर्माण झाली. याचं मर्मभेदक चित्रण जयंत पवार या नाटकात करतात. स्पर्धेतील नाटक आणि विषयाचा आवाका दिग्दर्शक महेंद्र खेडकर यांनी अगदी अवाॅर्ड सेरिमनीच्या प्रसंग उदा मेल अँकर अगदीच किरकाेळ वाटला.
दाभाड्यांची बायकाे यांच्यावर अधिक मेहनत घेणे गरजेचे हाेते. या गाेष्टीमुळे नाट्याचा प्रभावीपणा, एकसंध परिणाम साधण्यात अडथळे येतात. सत्यविजय दाभाडेंच्या भूमिकेत चंद्रकांत चाैधरी यांनी सामान्य माणसाच्या छटा आपल्या अभिनयाद्वारे दाखवल्या; परंतु त्यांना इतर सहकलावंतांची याेग्य साथ मिळणे आवश्यक हाेते. दाभाड्यांच्या कहाणीच्या बराेबरीने गावातून मुंबईत आलेल्या बबन येळमालेचीही गाेष्ट आहे. बबन पंकज बारी यांनी उत्तम वठवला. फिमेल अँकर चंचल धांडे भाव खाऊन जाताे. पार्श्वसंगीत मनाेहर ठाकूर प्रभावी करतात. संगीत उल्लेखनीय. या मर्मभेदी नाट्याचा फाॅर्म लक्षात घेता नाटकाचा शिलेदार अर्थात, दिग्दर्शक हा अष्टावधानी असणे गरजेचे असते. महेंद्र खेडकर नाटकातील समूह दृश्यसंवाद मेहनत घेताना दिसले; परंतु काही प्रसंगांवर बराेबर लक्ष दिले असते तर नाट्य अधिक प्रभावी झाले असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.