आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेरापंथ मंडळाच्या कार्यशाळेत वर्षा चाेरडियांचे मत‎:शरीर शिथील ठेवून चित्त‎ एकाग्र ठेवणे म्हणजे माैन‎

जळगाव‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीला दाेन मन असतत.‎ एक चेतन दुसरे अचेतन. न बाेलता‎ माैन बाळगले जाते पण विचारांचेही‎ माैन असते. शरिराला शिथील ठेवून‎ चित्त एकाग्र करणे हे सुद्धा माैनच‎ आहे. तणाव कमी करून हृदयाची‎ शक्ती वाढवण्याचे हे एक सशक्त‎ माध्यम आहे असे मत वर्षा‎ चाेरडिया यांनी व्यक्त केले.‎ अखिल भारतीय तेरापंथ महिला‎ मंडळाच्या निर्देशानुसार जळगाव‎ शाखेतर्फे अणुव्रत भवनात‎ कार्यशाळा घेण्यात आली. त्यात त्या‎ बाेलत हाेत्या. मंडळाच्या अध्यक्ष‎ नम्रता सेठीया यांनी मान्यवरांचे‎ स्वागत करून आगामी तीन‎ कार्यक्रमांची माहिती दिली. ‘द पाॅवर‎ ऑफ सायलेन्स’ या विषयावर‎ चाेरडिया यांनी विचार मांडले.

नेहमी‎ सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असे‎ सांगून त्यांनी ध्यानधारणेचे महत्व व‎ प्रात्यक्षिक सादर केले. दुसऱ्या‎ सत्रात नाटिका सादर करण्यात‎ आली. उमा सांखला यांनी त्यांना‎ साथ दिली. मीना छाजेड, राणी‎ चोरडिया, शीतल छाजेड, व मित्र‎ धाडेवा यांचा सहभाग हाेता. शीतल‎ बुच्चा यांनी सूत्रसंचालन केले.‎ लघुनाटिकेत सहभागी कलाकारांना‎ पारिताेषिक देऊन गाैरवण्यात आले.‎ या वेळी मंडळाच्या सदस्या‎ उपस्थित हाेत्या.‎

बातम्या आणखी आहेत...