आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव:डिवचलेल्या खडसे समर्थकांची राजकीय मोर्चेबांधणी सुरू

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘उत्तर महाराष्ट्र मंच’च्या झेंड्याखाली चाचपणी

भाजपमध्ये तब्बल पाच वर्षे घुसमट सहन करीत असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक आता ‘उत्तर महाराष्ट्र मंच’च्या झेेंड्याखाली एकत्र येत असून निर्णयासाठी त्यांच्यावर दबाव वाढवला आहे. राज्यभरातील खडसे समर्थक जुळवाजुळव करीत आहेत. काही जण दबाव गट तयार करून भाजपमध्येच राहावे या मताचे आहेत, तर काही पक्षांतरासाठी आग्रही आहेत. त्यातच प्रदेश भाजप पदाधिकारी पक्षातील विशेषत: जळगावातील खडसे समर्थकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.

निर्णयातील अडचणी.......

खडसे यांच्या कुटुंबातून त्यांच्या स्नुषा तथा खासदार रक्षा खडसे, पत्नी महानंदच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे किंवा कन्या रोहिणी खडसे यांनी मौन बाळगणेच पसंत केले आहे. सहानुभूती दाखवणे महागात पडू शकते यामुळेच खडसे यांनी आपल्या कुटुंबीयांना या वादापासून लांब ठेवल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...