आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Khadse Told The Secret Behind The Non expansion Of The Cabinet, He Said If The Cabinet Is Expanded, The Government Will Collapse The Next Day

शिंदे गटात अस्वस्थता:मंत्रिमंडळ विस्तार न होण्यामागे खडसेंनी सांगितले गुपित, म्हणाले- विस्तार होताच सरकार लगेच कोसळेल

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर आता मंत्रिमंडळ विस्तार केला तर, शिंदे सरकार दुसऱ्या दिवशीही कोसळेल अशी शक्यता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी वर्तवित आपसांतील वादातूनच हे सरकार कोसळणार असल्यानेच एकाच मंत्र्याला सहा - सहा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले गेले अशी टीका केली.

ते जळगावमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या एका कार्यक्रमात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते.

शिंदेंचे आमदार अस्वस्थ

एकनाथ खडसेंनी शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, पालकमंत्र्यांच्या भानगडी आहेत. बंड केलेले पन्नास बंडखोर आता अस्वस्थ झाले आहेत हे जनतेने आज लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपला मंत्रिपदासाठी नंबर लागत नाही हेही शिंदे गटातील आमदारांना शल्य बोचत आहे.

म्हणून मंत्रिमंडळ विस्तार नाही

खडसे म्हणाले, बच्चू कडू म्हणतात की, मला मंत्री करा. ते मंत्रीपद मागणारे एकमेव आहेत; पण आता त्यांच्या लक्षात आले की, मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. मंत्रिमंडळ केव्हा गठीत होईल जेव्हा सरकार कोसळण्याच्या स्थितीत असेल तेव्हा होईल. त्याआधी पंधरा दिवस किंवा महिन्याभराआधी होईल.

दुसऱ्याच दिवशी सरकार गडगडणार

खडसे म्हणाले, जर आता मंत्रिमंडळ विस्तार केला तर हे सरकार दुसऱ्या दिवशीही कोसळेल. आपसांतील वादातूनच हे सरकार कोसळेल. मला मंत्री का केले नाही, त्याला मंत्री का केले याचा वाद त्यात अपक्षांची वेगळीच मागणी आहे. याच वादातून सरकार दोलायमान होईल म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून एका एका मंत्र्याकडे सहा -सहा ठिकाणचे पालकमंत्रीपद आहेत.

बातम्या आणखी आहेत...