आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा प्रभाव दखवा:जीएमसीसाठी शासनाकडून निधी आणा खडसेंचे आव्हान, महाजन म्हणाले - पुढे काय काय होते ते बघा

जळगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्यामध्ये सुरु असलेले आरोप-प्रत्यारोपाचे द्वंद्व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही बघायला मिळाले. डीपीडीसीचा निधी ग्रामीण भागासाठी असताना वैद्यकीय महाविद्यालय व मनपासाठी देण्यात आला. हा ग्रामीण भागावर अन्याय आहे. 3 हजार कोटींचे मेडिकल हब उभारताहेत तर राज्य शासन निधी देत नाही का? तुमचा प्रभाव दाखवा, राज्य शासनाकडून निधी आणा, असे आव्हान खडसे यांनी महाजनांना दिले. प्रभाव आहेच, दिसेन,पुढे काय काय होते ते बघा,असा सूचक इशारा महाजनांनी दिला.

मुक्ताईनगर येथील क्रीडा संकुलासाठी शासकीय जागा असताना खासगी जागा लिजवर घेतली. महामार्गासाठी काम करणारी एल अ‌ॅन्ड टी सारखी कंपनी कुणामुळे सोडून गेली? पोलिस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा, याबाबत आमदार मंगेश चव्हाण व चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चौकशी होईल, असेही महाजन यांनी सूचित केले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, उन्मेष महाजन तसेच आमदार व अधिकारी उपस्थित होते. आमदार एकनाथ खडसे डीपीडीसीच्या बैठकीत पहिल्यांदाच आमदारांच्या रांगेत बसलेले दिसले.महाजन पालकमंत्री असतानाही त्यांना ज्येष्ठ आमदार म्हणून व्यासपीठावर बोलवण्यात आले होते.महाविकास आघाडी सरकारमध्ये गुलाबराव पाटील पालकमंत्री असतानाही त्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते.

या बैठकीत खडसे यांना व्यासपीठावर बोलवण्यात आले नाही. तसा प्रोटोकॉलही नाही. बैठकीच्या सुरुवातीलाच खडसे यांनी शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत पालकमंत्र्यांना प्रश्न विचारला.त्याचे उत्तर मंत्री महाजनांनी देण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांनी उत्तर दिले तर आनंद वाटेल,असा प्रतिप्रश्न खडसंेनी त्यांना केला. ग्रामविकास खात्याकडून प्रस्ताावना केली तर काय अडचण आहे? असे प्रत्युत्तर महाजनांनी दिले.त्याचप्रमाणे शहरी भागात निधी दिल्याने ग्रामीण भागावर अन्याय होत असल्याचा आरोप खडसे यांनी केल्यानंतर तो पालकमंत्र्यांचा विषय आहे. ते निर्णय घेतील. तुमच्या घरातून थोडा निधी दिला आहे,असेही उत्तर महाजन यांनी खडसेंना दिले.

आर्थिक व्यवहाराचा आरोप

जिल्हा परिषदेवर प्रशासक असताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परस्पर शिफारशी करीत आहेत.त्यांनी आर्थिक व्यवहार केल्याच्या तक्रारी येत आहेत.त्या संदर्भात कारवाई करण्याची मागणी आमदारांनी केली.पाणंद रस्त्यांमध्ये जिल्हा राज्यात सर्वात मागे आहे.त्याबाबत विचारले असता अधिकारी चमत्कारीक उत्तरे देतात.मनरेगा अंतर्गत होत असलेल्या कामांबाबतही आमदारांनी तक्रार केली.

मजूर फेडरेशनचे चेअरमन फॉर्च्युनरमध्ये येतात...

मनरेगाच्या कुशल,अशुकल कामांबाबत तक्रारी होतात.त्यामुळे अधिकारी काम करीत नाहीत,अशाही तक्रारी करण्यात आल्या.त्यावर पालकमंत्र्यांनी मजूर फेडरेशनमध्ये आयटी रिटर्न भरणारे मजूर आहेत.या संस्थेचे चेअरमन फॉर्च्युनरमध्ये येतात,असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...