आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Khadse's Daughter's 'dance ': Traditional Dance Performed With Women Of Vanjari Community, Dhulivandana Wishes Given By Rohini | Marathi News

खडसेंच्या कन्येचा 'ठेका':वंजारी समाजातील महिलांसोबत केले पारंपारिक नृत्य, रोहिणी यांनी दिल्या धुलीवंदनाच्या शुभेच्छा...

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या तथा महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथे वंजारी समाजातील महिलांसोबत पारंपरिक नृत्य केले. होळी तसेच धुलीवंदनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भातील माहिती रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर केली आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट नाकारल्यानंतर एकनाथ खडसे तसेच अ‍ॅड. हिनी खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच खडसे विरुद्ध फडणवीस असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत झळकवलेला 'पेन ड्राईव्ह' आणि नवाब मलिक यांच्यावर केलेल्या आरोपांवर देखील खडसे यांनी प्रत्युत्तर दिले होते.

वंजारी समाजाचे पारंपरिक नृत्य

उत्तर महाराष्ट्र आणि विशेषतः नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांमध्ये वंजारी समाज बांधव मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत. मात्र, आजही या समाज बांधवांनी आपली पारंपारिक परंपरा कायम जपण्याचा प्रयत्न केला आहे. यामधीलच हा एक नृत्य प्रकार आहे.

बातम्या आणखी आहेत...