आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:आवास योजना सचिवांशी खडसेंची चर्चा

जळगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री आवास (शहरी) योजना सचिवांची खासदार रक्षाताई खडसे यांनी दिल्ली येथे भेट घेतली. रावेर लोकसभा मतदारसंघातील पालिका क्षेत्रातील प्रस्तावित व मंजूर घरकुलांबाबत, खासदार खडसे यांनी योजनेचे सचिव मनोज जोशी यांच्याशी चर्चा केली.

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विविध विभागांतर्गत मंजूर घरकुलांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक झाली होती. गेल्यावेळच्या सरकारला या विभागासोबत ताळमेळ नसल्यामुळे, लाभार्थ्यांना घरकुलाचा पुढील हप्ता मिळण्यासाठी विलंब झाला. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सूचना केल्या आहेत. पूर्णता प्रमाणपत्र मिळताच पुढील हप्त्याचा निधी वर्ग करण्यात येईल, अशी माहिती सचिव मनोज जोशी यांनी खासदार खडसे यांना दिली. तसेच या योजनेसाठी नेमण्यात आलेले तांत्रिक कक्ष कर्मचाऱ्यांची पुणे येथे बैठक झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...