आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना:छेड काढल्याने अपहरण करून तरुणावर हल्ला; गाडगेबाबा चौक परिसरात शनिवारी रात्रीची घटना

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाचे काही मुलांनी अपहरण करुन नंतर प्राणघातक हल्ला केला. शनिवारी रात्री गाडगेबाबा चौक परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी रात्री उशिरा परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सय्यद अकबर सय्यद सलाउद्दीन (वय २२, रा. वंजारी टेकडी, समतानगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सय्यद अकबर हा एका घराकडे वारंवार पाहत होता. याचा राग आल्याने तीन जणांनी अकबरला दुचाकीवर बसवून एका चौकात नेले. तेथे त्याला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. ही माहिती मिळताच समतानगरातील अकबरच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत वाद मिटवले. जखमी अकबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक गोपाल देशमुख तपास करत आहेत. तर याचप्रकरणी दाखल दुसऱ्या फिर्यादीनुसार, संशयित अकबर दोन जूनपासून वारंवार परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला इशारे करत होता. शनिवारी सायंकाळी त्याने तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून अकबरविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...