आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमलकी एकादशीनिमित्त विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालयाच्या प्राथमिक विभागात शुक्रवारी संत मेळावा झाला. या मेळाव्यातून विद्यार्थ्यांनी संत साहित्य, संतांची ओळख, ओव्या अभंग, भजनाचा अनुभूती घेतली. या वेळी कीर्तन, भारुड, पावलीसह दिंडीची रंगत आणली हाेती. मेळाव्यास विठ्ठल रुख्मिणी प्रतिमेची पूजा व आरतीनंतर सुरुवात झाली. या वेळी दादा महाराज जोशी, महापौर जयश्री महाजन, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, रामानंद पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रोहिदास गभाळे, शालेय समिती प्रमुख हेमा अमळकर, मुख्याध्यापिका योगिता शिंपी उपस्थित होत्या.
संत मेळाव्यात २०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. त्यांनी कीर्तन, भारुड, अभंगवाणी, पावली व दिंडीने भक्तिभाव निर्माण केला. संतांच्या जीवनावर आधारित प्रसंग पथनाट्यातून सादर केली. संतांच्या गोष्टींची हस्तलिखितातून ओळख झाली. विद्यार्थ्यांनी काढलेल्या संताच्या चित्रांचे चित्रकला प्रदर्शन लक्ष वेधून घेत होते.
संतांच्या डॉक्युमेंट्रीतून वर्षभरातील एकादशीचा आढावा सांगितला. संत तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर, गोरा कुंभार, सावता माळी, सेना महाराज, चोखामेळा, नरहरी सोनार, मुक्ताबाई, सखुबाई, पुंडलिक, निवृत्तीनाथ, एकनाथ या संतांची पात्र विद्यार्थ्यांनी वेशभूषेसह साकारली हाेती. विद्यार्थ्यांनी साकारलेले पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर हे मेळाव्याच आर्कषण होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.