आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:विक्रेत्यावर चाकूहल्ला ; पैसे द्यावे लागतील असा दम भरत विक्रेत्यांवर दोघांनी केला हल्ला

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील असा दम भरत दोघांनी एका विक्रेत्यावर चाकूहल्ला केला. ही घटना १ जून रोजी रात्री एमआयडीसीत घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

शिवनाथ आसाराम शिंदे (वय ३५, रा. अयोध्यानगर) यांची एमआयडीसीत चहा-नाश्त्याची हातगाडी आहे. तेथे राहुल रामचंद्र बऱ्हाटे व गणेश अर्जुन कोळी हे दोघे आले. या जागेवर व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असा दम त्यांनी शिवनाथला भरला. शिवनाथने पैसे देण्यास नकार करताच दोघांनी त्याच्यावर चाकूहल्ला केला. यात शिवनाथ जखमी झाला आहे. त्याच्यावर जीएमसीत उपचार सुरू आहे.

या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा केल्यानंतर दोघेजण भोलाणे येथे पळून गेले होते. पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, किशोर पाटील, सुधीर साळवे, गोविंदा पाटील, मुकेश पाटील यांनी दोघांना अटक केली. ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. हद्दपारीची शिक्षा रद्द झाल्यानंतर त्यांनी हा गुन्हा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...