आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुक:चाकूहल्ला करणाऱ्याला सक्तमजुरीची शिक्षा

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिरवणुकीत नाचताना बोट का टोचले या कारणावरून केलेल्या चाकूहल्ल्याप्रकरणी आरोपी सीताराम महादू खैरनार (वय २७, रा. नागसेननगर, पाचोरा) याला न्यायालयाने मंगळवारी दोन वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांनी हा निकाल दिला आहे.

१४ एप्रिल २०१८ रोजी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूक संपल्यानंतर मिरवणुकीत बोट का टोचले, तुला मारामारी करायची आहे का?, तुला मारूनच टाकतो म्हणून सीताराम खैरनार याने सिध्दार्थ युवराज खेडकर याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना पाचोऱ्यातील भारत मैदानावर घडली होती. सुनावणी अंती न्यायालयाने खैरनार याला शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे ॲड. नीलेश चौधरी यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...