आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्याचा डोंगर:सम्राट कॉलनीसह परिसरात मुलभूत सुविधाचाच अभाव; पालिकेचे दुर्लक्ष ; गटारी नसल्याने अडचण; रात्री पथदिवेही असतात बंद

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अनेक महत्त्वाचे रस्ते, गटारी व पथदिवे आदींच्या समस्या मार्गी लागत आहेत. मात्र, अजूनही अनेक कॉलन्या, नगरे, वसाहती ह्या मुलभूत सुविधांसाठी प्रतीक्षा करत आहेत. यातच सम्राट कॉलनी परिसरातील अनेक भागात रस्ते, गटारी, पथदिवे नसल्याने तसेच कचऱ्याच्या समस्यांनी येथील नागरिक त्रस्त आहेत. सम्राट कॉलनीसह ईश्वर कॉलनी परिसरातील अनेक गल्ल्यांमध्ये रस्ते व गटारी नाहीत. तसेच अनेक भागातील पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असतात. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यांवरून वापरणेही अवघड झाले आहे. गटारी नसल्याने पाणी तुंबून डासांची उत्पत्ती वाढून साथीचेही रोग पसण्याचा धोका आहे. त्यामुळे या कॉलन्यांमध्ये रस्ते, गटारी, पथदिवे आदी मूलभूत सुविधा तरी पुरवावेत अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...