आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:विद्यापीठात रोजगाराभिमुख; उद्योजकीय कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचा अभाव

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीत ‘अ’ श्रेणी कायम राखली असली तरी २०१५च्या तुलनेत ०.२ने श्रेणी घसरली आहे. यंदा ३.०९ अशी एकत्रित गुणांची सरासरी (सीजीपीए) प्राप्त झाली. समितीने विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदवी स्तरावरील अभ्यासक्रम वाढवावेत, आंतर विद्याशाखीय रोजगाराभिमुख अभ्यासक्रम अधिक सुरू व्हावेत ज्यामुळे उद्योजकीय कौशल्य वाढेल अशा सूचना विद्यापीठाला अहवालात दिल्या आहेत.

विद्यापीठात २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान नॅक पिअर टीमने प्रत्यक्ष भेट दिली होती. या वेळी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनाला सामोरे गेले. विद्यापीठाने जानेवारीत राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाण परिषदेकडे (नॅक) स्वयंमूल्यांकन अहवाल सादर केल्यानंतर जून २०२२मध्ये तो नॅकद्वारे मान्य करण्यात आला. या अहवालाच्या आधारे विद्यापीठाचे ७० टक्के मूल्यमापन यापूर्वीच झाले होते, तर गुणवत्ता आधारित ३० टक्के मूल्यमापनासाठी नॅक पिअर टीम प्रत्यक्ष विद्यापीठात आली होती. या पिअर टीमने शैक्षणिक प्रशाळा, प्रशासकीय विभाग, विद्यार्थी वसतिगृह आदींना भेटी दिल्या. तसेच आजी व माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. या भेटीनंतर नॅककडे आपला अहवाल सादर केला होता.

अत्याधुनिक प्रयाेगशाळा ठरली आहे जमेची बाजू
नावीन्यपूर्ण आणि गरजेवर आधारित अभ्यासक्रम, आनंददायी वातावरणासह प्रदूषणमुक्त विद्यापीठ परिसर, परिक्षेत्रातील ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूक भागवण्याचे सामर्थ्य, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संगणकीय सुविधा उपलब्ध, उत्तम भौतिक सुविधा आणि माहिती व तंत्रज्ञानाचा वापर, गुणवत्तापूर्ण व निष्ठावान शिक्षक, अध्ययन, अध्यापन, परीक्षा आणि प्रशासनात संगणकाचा उत्तम वापर, लवचीक आणि सर्वांचा सहभाग यामुळे संस्थेबद्दल लोकांमध्ये आपुलकीची भावना, पुरेशा क्रीडा सुविधा अशा १० मुद्द्यांचा ठळकपणे उल्लेख पिअर टीमने निरीक्षण अहवालात केल्याचे समाेर आलेले आहे.

अशा दिलेल्या आहेत महत्त्वाच्या सूचना
रिक्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या जागा त्वरित भरा, कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना अंतर्गत वाहतुकीसाठी पुरेशा सुविधा वाढवा, परराज्य व इतर देशांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक विद्याशाखेत प्रवेश परीक्षा असाव्या. विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदवी स्तरावरील अभ्यासक्रम वाढवावे, आंतरविद्याशाखीय रोजगाराभिमुख अभ्यासक्रम अधिक सुरू करण्यावर भर दिला पाहिजे. देशांतर्गत व देशाबाहेर शिक्षक आदान-प्रदान व्हावेत.विद्यापीठात स्पर्धा परीक्षांसाठी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा विस्तार व्हावा, उच्च पदावर असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा, केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष अधिक मजबूत करावा.

बातम्या आणखी आहेत...