आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत कलागाैरव पुरस्कार:लाेकशाहीर शिवाजीराव पाटलांचा‎ मुंबईत ज्येष्ठ कला गाैरवने सन्मान‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईच्या चंद्रशेखर सांडवे‎ प्रतिष्ठानचा कलादर्पण राैप्य‎ महाेत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्रातील‎ २५ सर्वश्रेष्ठ कलावतंतांचा सन्मान‎ साेहळा गुरुवारी पार पडला. त्यात‎ पाचाेरा तालुक्यातील नगरदेवळा‎ येथील लाेकशाहीर शिवाजीराव‎ पाटील यांना ज्येष्ठ कला गाैरवने‎ सन्मानित करण्यात आले.‎ मुंबई प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य‎ मंदिरात हा कार्यक्रम झाला. सुप्रसिद्ध‎ पार्श्वगायक व भजन गायक अनुप‎ जलोटा यांच्यासह नाटक व चित्रपट‎ क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित‎ होते. लावणी, तमाशा, शाहिरी,‎ लोकसंगीत, चित्रपट दिग्दर्शक,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ नाट्य अभिनेते, विविध खेळाडूंना‎ गाैरवण्यात आले.

वयाच्या‎ सत्तरीकडे वाटचाल करीत‎ असताना देखील शाहीर‎ शिवाजीराव पाटील यांच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आवाजात पहाडी व दमदार अशी‎ जादू आहे. त्यांना मिळालेली शाहिरी‎ लेखणी व आवाज ही ईश्वरदत्त‎ देणगी असल्याचे प्रतिपादन गायक‎ अनुप जलोटा यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...