आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:जमीन व्यवहार फसवणूक; अटकपूर्व जामिनासाठी जगवानी यांचा अर्ज

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पिंप्राळा शिवारातील सुमारे ५ ते ६ काेटी रुपयांच्या जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी तालुका पाेलिस ठाण्यात गुरुवारी दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक हाेऊ नये यासाठी माजी आमदार गुरुमुख जगवानी यांनी शनिवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर साेमवारी निकाल हाेईल.

अशाेक नामदेव राणे (वय ६३, रा. भाेईटेनगर) यांच्या तक्रारीवरून अजगर अजिज पटेल (रा. भादली), गुरुमुख मेहरुमुल जगवाणी, हरीश के. मंधवाणी, नीलेश विष्णू भंगाळे, विठ्ठल गलाजी साेळंकी, मीना विठ्ठल साेळंकी व एच.ए. लाेकचंदाणी या सात जणांविरुद्ध शुक्रवारी तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पाेलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात संशयित आराेपी असलेले माजी आमदार गुरुमुख जगवानी यांनी शुक्रवारी अॅड. दिलीप मंडाेरे यांच्या मार्फत न्या. काळे यांच्या काेर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला.

सात जणांविरुद्ध तालुका पाेलिसांत गुन्हा दाखल
अजिज पटेल यांच्यासह सातही संशयितांना ग्राम सुधार समिती कानळदा या संस्थेच्या नावाने खाेटी माहिती असलेला अर्ज दि. १३/३/२०१३ राेजी धर्मादाय आयुक्त, नाशिक यांच्या कार्यालयाकडे केला हाेता. ज्यात खाेटे कागदपत्र व बनावट दस्तएेवजाच्या मदतीने संपूर्ण प्रक्रिया पार पाडली.

त्या कागदपत्रांच्या मदतीने पिंप्राळा शिवारातील गट क्र. ३३८/१ क्षेत्र ६६ आर. गट क्र. ३३९/अ क्षेत्र ९५ आरमधील जमीन व्यवहारासाठी जळगाव पीपल्स बँकेच्या गणेश काॅलनी शाखेत बनावट कागदपत्र दाखल करून खाते उघडून १९/७/२०१३ राेजी ४८ पानांचे खरेदी खत करून संस्थेच्या भूखंडाची गुरुमुख जगवानी यांना संगनमताने विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार अशाेक राणे यांनी दिल्याने सात जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...