आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपाकडून गेल्या चार महिन्यांपासून मालमत्ता करात १० टक्के सूट देण्यात येत आहे. आतापर्यंत २९ हजार १८ करदात्यांनी २६ काेटी ९ लाख रुपयांचा भरणा केला. विशेष म्हणजे मालमत्तेच्या मालकीण असलेल्या ३०० महिलांनी १५ टक्के सूट मिळवलेली आहे.
मनपाच्या मिळकत व्यवस्थापन विभागाकडून दरवर्षी एप्रिल महिन्यात मालमत्ता करात १० टक्के सूट दिली जाते. यंदा महिला मिळकतधारक असल्यास त्यांना १५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही सवलत केवळ एप्रिल महिन्यापर्यंत मर्यादित न ठेवता महापाैर जयश्री महाजन यांनी ३१ जुलैपर्यंत वाढवली आहे. आतापर्यंत शहरातील १ लाख २० हजार मालमत्ताधारकांपैकी २९ हजार १८ करदात्यांनी १० टक्के सूट मिळवली आहे. या करदात्यांनी मुदतीत लाभ घेतल्यामुळे पालिकेच्या तिजाेरीत चार महिन्यात २६ काेटी ९ लाख रूपयांचा भरणा हाेऊ शकला. यंदापासून मालमत्ता कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे उद्दिष्ट वाढवण्यात आले. ९० काेटी वसुलीचे टार्गेट दिले आहे.
रविवारीही घरपट्टी वसुली विभाग दुपारी सुरू राहणार
करात सूट मिळवण्यासाठी आता ३१ जुलै ही शेवटची मुदत आहे. शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत. शनिवार व रविवारी अर्थात ३० व ३१ जुलैला प्रभाग कार्यालयातील घरपट्टी वसुली विभाग दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.