आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता वाढली:गेल्यावर्षी मार्चअखेर तर यंदा पहिल्याच‎ आठवड्यात जिल्ह्यात ढगाळ वातावरण‎

जळगाव‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल‎ २० दिवस आधीच तापमान‎ उच्चांकी पातळीवर पाेहाेचले आहे.‎ त्यासाेबतच अवकाळी पावसाच्या‎ ढगांनी देखील मार्च महिन्याच्या‎ पहिल्याच आठवड्यात आकाशात‎ गर्दी केली आहे. गेल्या वर्षी मार्च‎ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात‎ अवकाळी, वादळी पावसाचा‎ फटका बसला हाेता.‎ राज्यात शनिवारी अवकाळी‎ पावसाच्या ढगांनी आकाशात गर्दी‎ केली आहे. हवामान विभागाच्या‎ निरीक्षणानुसार येत्या ७ मार्चपर्यंत‎ राज्यात अवकाळी पाऊस तर काही‎ ठिकाणी गारपीट हाेण्याची शक्यता‎ आहे. गेल्या वर्षी २३ मार्च राेजी‎ जळगाव जिल्ह्यात अवकाळी‎ पाऊस झाला हाेता. गेल्या १२ वर्षांत‎ आठ वेळा मार्च महिन्यात‎ अवकाळी पावसाने जाेरात झाेडपले‎ आहे. त्यात चार ते पाच वेळेत‎ गारपीट झाली आहे. सन २०१२,‎ २०१३ या वर्षीच्या मार्च महिन्यात‎ गारपिटीमुळे शेतीचे माेठ्या‎ प्रमाणावर नुकसान झाले हाेते.‎

चार दिवस‎ अवकाळी,‎ वादळाची‎ शक्यता‎
मार्च महिन्यात एरवी दुसऱ्या पंधरवड्यात वातावरण बदलातून अवकाळी‎ पावसाचे संकट आेढवत असते. यावर्षी मात्र पहिल्याच आठवड्याच्या शेवटी‎ अवकाळी, वादळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. यात उत्तर महाराष्ट्रासह‎ विदर्भ आणि मराठवाड्यात चार दिवस ही स्थिती राहण्याचा अंदाज आहे.‎

हवामान विभागाचा अंदाज‎
४ ते ८ मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात‎ तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. ५‎ ते ८ मार्च दरम्यान विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस‎ पडेल. ७ मार्च राेजी मध्य प्रदेश, विदर्भ, उत्तर‎ महाराष्ट्रात गारपीट हाेऊ शकते, असा अंदाज भारत‎ माैसम विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...