आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:स्व. हिरालाल जैन यांचा 32 वा स्मृतिदिनानिमित्त; जैन इरिगेशनच्या शिबिरात 441 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन

जळगाव7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांचे वडील स्व. हिरालाल जैन यांच्या ३२ व्या स्मृतिदिनी आयोजित रक्तदान शिबिरात ४४१ इतक्या रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले. रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृति प्रतिष्ठान संचलित स्व. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, सिव्हिल हॉस्पिटल या संस्थांनी रक्ताचे संकलन केले. शिबिरात जैन प्लास्टिक पार्क येथे २८२, जैन फूड पार्क येथे ९७, कांताई नेत्रालय येथे ४, जैन एनर्जी पार्क४३, जैन अॅग्रिपार्क व जैन डिव्हाइन पार्क १५ रक्ताच्या बाटल्यांचे संकलन केले. शिबिराचे बुधवारी सकाळी ८ वाजता जैन प्लास्टिक पार्क डेमो हॉल येथे कंपनीचे जुने सहकारी विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी सुवन शर्मा, जी. आर. पाटील, डॉ. संदीप पाटील, सुनील गुप्ता, संजय पारख, टी. बी. पाटील, व्ही. पी. पाटील, किशोर बावीस्कर, प्रदीप सांखला, आर. डी. पाटील, जेठमल तापडिया उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...