आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावकीमुळे नात्याला काळीमा:जळगाव जिल्ह्यातील खळबळ जनक घटना, शेतात बैल जोडी गेल्याने काकाने घेतला पुतण्याचा जीव

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव जिल्ह्यातील वाडी शेवाळे या पाचोरा तालुक्यातील गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. पुतण्याची बैल जोडी शेतात गेल्याच्या रागातून काकाने पुतण्याच्या डोक्यात जोरदार वार केला. त्यामुळे गंभीर जखमी असलेला पुतण्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित काकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात पुनमचंद भावराव भोसले (48) असे मृत पुतण्याचे नाव आहे. प्रल्हाद मोतीराम भोसले यांच्यासोबत पुनमचंद यांचा शेतजमीनीवरुन वाद होता. या दोघांच्याही शेतजमीन शेजारी-शेजारी आहेत. दरम्यान 27 नोव्हेंबर रोजी पुनमचंद यांची बैलजोडी दुपारी चार वाजेच्या सुमारास काका प्रल्हाद भोसले यांच्या शेतात शिरली. त्यामुळे रागा-रागात प्रल्हाद यांनी त्यांचा मुलगा गणेश भोसले याच्या साथीने पुनमचंद भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार वार केला.

या घटनेत पुनमचंद भोसले गंभीर जखमी झाल्याने त्यांना जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांविरोधात तक्रार, संशयित पोलिसांच्या ताब्यात

या घटनेतील मृत पुनमचंद भोसले यांचा मुलगा किरण भोसले याच्या तक्रारीवरून काका प्रल्हाद भोसले आणि त्यांचा मुलगा गणेश भोसले या दोघांविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी फिर्यादीवरुन पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनासाठी पुढील तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...