आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालक्ष्मीनगर, ढाकेवाडी, जोशी कॉलनी परिसरात अनेक वर्षांपासून रस्ते नाहीत. रस्त्यांप्रमाणेच या परिसरात गटारी नाहीत. तसेच गटारीवरील तुटलेले ढापे, रस्त्यांच्या वर आलेले चेंबरचे झाकण अशा अनेक समस्यांनी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. काही कॉलन्यांमध्ये २० वर्षांपासून रस्तेच झाले नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. लक्ष्मीनगर, ढाकेवाडी, जोशी कॉलनीत अनेक वर्षांपासून रस्त्यांची वानवा आहे. या परिसरात एकही रस्ता धड नसल्याने पावसाळ्यातच नाही तर इतर दिवसांतही या रस्त्यांवरून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. त्यातच या परिसरात अनेक ठिकाणी गटारीवरील ढापेदेखील तुटलेले आहेत. यात ढाकेवाडीतील लाठी शाळेजवळ गटारीवरील मध्यभागी असलेल्या ढाप्यावरील पडलेला खड्डा अपघाताला निमंत्रण देणार ठरत आहे. रात्री-अपरात्री तुटलेल्या ढाप्यावरील हा खड्डा भरधाव वाहन चालकांना दिसत नसल्याने अनेक जण या खड्ड्यात पडले आहे. तर काही दिवसांपूर्वीच या खड्ड्यात एक दांपत्य पडल्याचे येथील प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.