आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएलसीबीच्या पथकाने चाेपडा शहरात कमरेला गावठी पिस्तूल लावून फिरणाऱ्या एकाला पकडले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. त्यांच्याविरुद्ध चाेपडा शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबी पीआय किसन नजनपाटील यांना मिळालेल्या माहितीवरून हेड काॅन्स्टेबल संदीप पाटील, गाेरख बागुल, प्रवीण मांडाेळे व परेश महाजन यांचे पथक रवाना हाेऊन त्यांनी चाेपडा शहरातील कारगिल चाैकाजवळील भाऊ हाॅटेलजवळ अजित गुजर बारेला (वय ३७, रा. रंगराव आबानगर, चाेपडा, मूळ रा. पानसेमल) याला ताब्यात घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.