आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Lead In The State, Yet Shiv Sena NCP Will Fight Separately In Erandol; Statement Of Former Guardian Minister Dr. Satish Patil In Parola Meeting \marathi News

राजकीय वृत्त:राज्यात आघाडी, तरीही एरंडोलमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वेगळेच लढणार; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांचे पारोळ्यातील बैठकीत प्रतिपादन

पारोळा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारोळ्यात संपर्क कार्यालयाच्या परिसरात बुधवारी राष्ट्रवादीची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांनीही संबोधित केले. जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी पारोळ्यानंतर अमळनेर, मुक्ताईनगर, चोपडा मतदार संघातही स्वबळाचा नारा दिल्याचे सांगितले. प्रत्येक जि.प. गटात मेळावे घेऊन सभासद नोंदणी वाढवा, प्रशिक्षण शिबिरे घेण्याचे आवाहन केले. एजाज मलिक, अशोक लाडवंजारी, विनोद पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, अरविंद मानकरी, जि.प.सदस्य रोहन पवार, हिंमत पाटील, अशोक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक रोहन मोरे, उमेश नेमाडे, राजेंद्र शिंदे, डॉ.शांताराम पाटील, प्रा.आर.व्ही.पाटील, मनोराज पाटील उपस्थित होते.

खान्देशचे नेतृत्व करावे
जी सडेतोड वृत्ती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आहे तोच गुण डॉ.सतीश पाटील यांच्यातआहे. निवडणुकीत पराभव झाला नसता तर ते निश्चितच मंत्री राहिले असते. तरीही त्यांनी संघटन टिकवून ठेवले. त्यांनी आता खान्देशचे नेतृत्व करावे, असे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांनी सांगितले.
माजी आमदार अरुण पाटील, अरविंद मानकरी, जि.प.सदस्य रोहन पवार, हिंमत पाटील, अशोक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक रोहन मोरे, उमेश नेमाडे, राजेंद्र शिंदे, डॉ.शांताराम पाटील, प्रा.आर.व्ही.पाटील, मनोराज पाटील उपस्थित होते.

दोघांनी शिवसेना सोडली
यावेळी इंधवे येथील सरपंच जितेंद्र पाटील व नगरसेवक सुधाकर पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. जितेंद्र पाटील यांच्या पत्नी माजी पं.स. सभापती आहेत. तर सुधाकर पाटील यांच्या पत्नी माजी नगरसेविका असून महालपूर, इंधवे गटात दोघांचे समर्थक आहेत.
राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोलताना अविनाश आदिक.

बातम्या आणखी आहेत...