आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण:‘आरटीई’ सोडत ऑनलाइन; 4 एप्रिलनंतर प्रवेशप्रक्रिया, जिल्ह्यात 285 शाळा आहेत पात्र

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. बुधवारी पहिली सोडत ऑनलाइन स्वरूपात पार पडली. दरम्यान ४ एप्रिलनंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी १० मार्च शेवटची तारीख होती. त्यानुसार पालकांनी प्रवेश अर्ज दाखल केलेले आहेत. जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी २८५ शाळा पात्र आहेत. त्यात एकूण ३ हजार १४७ एवढी प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी ८ हजार ३५४ जणांचे अर्ज दाखल झाले आहेत. एकूण प्रवेश क्षमतेच्या तिप्पट अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आपल्या पाल्यांना प्रवेश मिळेल की नाही अशी चिंता पालकांना आहे. प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया ४ एप्रिलनंतर सुरू हाेणार आहे. त्यामुळे पालकांचे लक्ष आता या तारखेकडे लागले आहे.

जागा असायच्या रिक्त
गेल्या दाेन वर्षांचा काळ हा कोरोनाचा होता. जवळपास सर्वच शाळांचे अध्यापन, अध्ययन ऑनलाइन होते. त्यामुळे तेव्हा अनेक ठिकाणी जागा रिक्त राहिल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...