आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ष नवे, विचार नवा:मेहरूण तलावातील बेटावर लेझर शाे, बाेटिंगची संधी; उदयपूर, भाेपाळ, हैदराबादचा करा अभ्यास

जळगाव / प्रदीप राजपूतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मेहरुण तलाव हा जळगाव शहराची समृद्धी म्हणून ओळख निर्माण करताे आहे. देशांत तलावांची जलसमृद्धी लाभली अशा माेजक्या शहरांमध्ये जळगावचाही समावेश आहे. समृद्धी अन् मांगल्याच्या कळसाप्रमाणे नेहमी जलसमृद्ध असलेला हा तलाव अन्य शहरातील तलावांच्या धर्तीवर पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्याची संधी आहे. उदयपूर, भाेपाळ, नैनीताल येथील तलावांचा अभ्यास करून मेहरुणवरही कृत्रिम बेटावर लेझर शाे, बाेटींगची संधी आहे.

पर्यटन विकासाच्या अनुषंगाने या तलावासाठी पाच काेटी निधी मंजूर झाल्याचा दावा केला जाताे आहे. प्रत्यक्षात हा निधी निर्विघ्नपणे नियाेजबद्धरित्या तलावासाठी खर्च हाेण्याची अपेक्षा आहे. शहराच्या दक्षिण-पूर्व काेपऱ्यात असलेल्या मेहरूण तलावातील पाण्याचा प्रत्यक्षात वापर हाेत नसल्याने तलावात बाराही महिने पाणी उपलब्ध असते. यंदाही ताे शंभर टक्के भरलेला आहे. देशात तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या भाेपाल, नैनीताल, उदयपूर, श्रीनगर या शहरांसह हैद्राबाद, काेल्हापूर आणि काेडाईकनाल येथे तलावांमुळे पर्यटन विकसीत झाले.

महाेत्सवही घेता येईल तलावाभाेवती पर्यटनाच्या मुलभूत सुविधा उभ्या केल्यास येथे दाेन-तीन दिवसांच्या सांस्कृतीक महाेत्सवाेच आयाेजन करण्याची संधी आहे. तलावाची काेणतीही हानी हाेऊ न देता तलावभाेवती अशा सुविधा उभ्या करता येणे शक्य आहे. पाच काेटी रूपयांच्या निधीसह जिल्हा नियाेजन समितीकडून यासाठी निधी उपलब्ध हाेवू शकताे. कला, साहित्य, संस्कृतीचा अभ्यास करणारे दालनही उभारता येईल.

या आहेत प्रमुख संधी मेहरूण तलावाला उत्तरेकडील बाजुने ४४ हेक्टरचे शिवाजी उद्यान तर पूर्व आणि दक्षिण बाजुने शेतजमीन, जंगलक्षेत्राची जाेड आहे. पश्चिमेकडून वस्ती वाढली आहे. तिन्ही बाजुने रस्ता आहे. तलावाच्या मध्यभागी कृत्रिम बेट उपलब्ध आहे. सर्व बाजुंनी वृक्ष लागवड तसेच जाॅगिंग ट्रकही तयार केला जाताे आहे. तलावातील बेट पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करणे, बाेटिंग, लेझर शाे या बाबींवर विकास हाेऊ शकताे.

बातम्या आणखी आहेत...