आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव उन्हाळ्यात गुणकारी म्हणून सरबतसाठी लिंबूला वाढती मागणी असते. त्यामुळे गेल्या आठवड्यापर्यंत किरकाेळ बाजारात १०० रुपये किलो मिळणारे लिंबाचे दर शनिवारी ४० रुपयांपर्यंत खाली आले हाेते.
मध्य प्रदेश व बिहार येथील व्यापाऱ्यांकडून मालाची उचल घटल्याने हे दर घटले आहे.
मागणी वाढती
उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सरबतासाठी, लग्नसराईत जेवणावळीत, उसाच्या रसात चवीसाठी लिंबूचा वापर केला जाताे. त्यामुळे अचानक लिंबाची मागणी वाढते. खान्देशातील उत्राण, जामनेर, पाचोरा येथील लिंबांना मोठी बाजारपेठ आहे. थेट मध्य प्रदेश अाणि बिहार राज्यातील व्यापारी जळगाव बाजार समितीत येऊन मालाची खरेदी करतात.
लिंबाची आवक वाढली
गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्या राज्यात मालाची मागणी कमी झाल्याने त्यांनी खरेदीसाठी येणे थांबवले असल्याचे बाजार समितीचे लिलावसमन्वयक वासुदेव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, घाऊक बाजारात लिंबाची मागणी वाढती असल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर माल बाजारपेठेत अाणला जात हाेता; परंतु बाहेरचे व्यापारी येणे बंद झाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना माल ताेडू नका, असा सल्ला दिला. तरीही बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर माल येत आहे. दरराेजची अावक १५ ते २० क्विंटल हाेत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.