आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

तळोदा:गुजरात हद्दीजवळ बिबट्याचे दर्शन, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

तळोदा11 दिवसांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

तळोदा तालुक्यातील गुजरात हद्दीनजीक असणाऱ्या आमलाड ते दसवड खांडसरी दरम्यान काल(दि.13) संध्याकाळी 8.25 वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले.

शहादा तालुक्यातील काही तरुण तलोद्याकडून शहादाकडे जात असताना वाटेत त्यांना बिबट्या दिसला. यावेळी त्यांनी त्या बिबट्याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर तिथून 500 मीटर अंतरावर असलेल्या सिद्धिविनायक पेट्रोल पंपावर ते थांबले आणि पंपाचे मालक संजय चौधरी यांना घडलेली घटना सांगितली. या बाबतीत दैनिक दिव्यमराठीने संजय चौधरी यांच्याशी संपर्क केला असतां त्यांनी यापूर्वीही दोन वेळा रात्री बिबट्याला रस्ता ओलांडताना पाहिले असल्याचे सांगितले.

दरम्यान, ज्या ठिकाणी बिबट दिसला, तो भाग महाराष्ट्र हद्दीत असला तरी गुजरात हद्द इथून जवळच आहे. गुजरात महाराष्ट्र हद्दीवर सदर भाग असून या अगोदर अनेकदा बिबटया उघड्या डोळ्यांनी दिसला आहे. या तरुणांनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.