आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मनिर्भर युवती‎ अभियानाचा मंगळवारी समारोप:विद्यापीठात युवतींना दिले‎ आत्मनिर्भर हाेण्यासाठी धडे‎

जळगाव‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र‎ विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्र,‎ सामाजिकशास्त्र प्रशाळा आणि विद्यार्थी‎ विकास विभागातर्फे आयोजित महिला‎ जागर सप्ताह: आत्मनिर्भर युवती‎ अभियानाचा मंगळवारी समारोप झाला.‎ समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी‎ विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.‎ सुनील कुलकर्णी उपस्थित होते.‎ अध्यक्षस्थानी सिनेट सदस्या डॉ. कीर्ती‎ कमलजा होत्या. गौतमी जगदेव, तेजश्री‎ तायडे, अंकिता गिरासे यांनी अभिप्राय‎ नोंदवला.

डॉ. कमलजा यांनी आपल्या‎ ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील‎ महिलांच्या जनजागृतीसाठी करावा, असे‎ आवाहन केले. सोमवारी या सप्ताहात‎ शासनाच्या विविध योजनांबद्दल जिल्हा‎ महिला व बालविकास समुपदेशक विद्या‎ सोनार यांनी माहिती दिली. महिला सहायक‎ कक्ष कार्यप्रणाली आणि शासनाच्या योजना‎ याबद्दल त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.‎ या वेळी विभाग प्रमुख डॉ. संजीवनी‎ भालसिंग, समन्वयक डॉ. विश्रांती मुंजेवार,‎ भाग्यश्री पाटील आदी उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...