आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्पस्थळी केला अभियंत्यांचा सत्कार:शेळगाव बॅरेजच्या योजनेस चालना देऊ : मंत्री महाजन

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीर्घकाळानंतर काम पूर्ण झालेल्या तापी नदीवरील शेळगाव बॅरेजमध्ये आता जलसाठा करण्यास सुरुवात झाली आहे. पाच दिवसांत सुमारे ३ घनमीटर पाणीसाठा झाला आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी माजी खासदार स्व.हरिभाऊ जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आता प्रकल्पावर आधारित उपसा सिंचन योजनेला चालना देण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

गेल्या आठवड्यापासून शेळगाव बॅरेजमध्ये पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्व.हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमोल जावळे यांच्यासह भाजप पदाधिकारी, शेतकऱ्यांनी सोमवारी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता य.का.भदाणे, तांत्रिक सल्लागार पी.आर.पाटील, कार्यकारी अभियंता स.रां.भोसले, उपविभागीय अधिकारी हेमंत डी.सोनवणे यांचा प्रकल्प स्थळी सत्कार केला. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांसोबत ऑनलाइन संवाद साधला. भाजपचे पदाधिकारी उमेश फेगडे, गणेश नेहते, पुरूजित चौधरी, नारायण चौधरी, हर्षल पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...