आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय स्थिरतेची हमी:आमदार फाेडाफाेडीनंतर पदाधिकाऱ्यांशी संपर्क; शिंदे गटाकडून जाेरदार हालचाली झाल्या सुरू

जळगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेतून ४० आमदार व १२ खासदारांनी बंड केल्यानंतर पक्ष दाेन गटात विभागाला गेला आहे. सत्ता काबीज केल्यानंतर शिंदे गटाकडून संघटनेवरही पकड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातूनच शिंदे गटाकडून जळगाव शहरातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क सुरू झाला आहे. संघटनेतील प्रमुख पदांसाेबत भविष्यातील राजकीय स्थिरतेची हमी दिली जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

शिवसेनेत सर्वात माेठे बंड झाल्यानंतर पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते विभागले गेले आहेत. हिंदुत्व हा एकच विचार असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांविषयीची निष्ठा मात्र बदलली आहे. त्याचा अनुभव गेल्या काही दिवसांपासून जिल्हा व शहर पातळीवर सुरू असलेल्या घडामाेडींवरून दिसत आहे. दरम्यान, लहानपणीच संघटनेत काम सुरू केलेले अनेक चेहरे शिंदे गटात दाखल झाले आहेत. संघटना पातळीवर शिंदे गटाकडून ठाकरे गटाची ताकद कमी करण्यासाठी थेट पदाधिकाऱ्यांनाच गळाला लावण्याचे जाेरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...