आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय कामकाज:जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांसाठी लिफ्ट मंजूर

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामकाजाच्या निमित्ताने येणाऱ्या दिव्यांग बांधवांना दुसऱ्या मजल्यावर ये-जा करण्यासाठी अडचण येते. त्यामुळे जिल्हा विकास समितीमार्फत दिव्यांगांसाठी लिफ्टचे काम मंजूर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ही १५० वर्षांपूर्वीची आहे. हेरिटेज प्रकारातील इमारत असल्याने हेरिटेज इमारतीत मनपा हेरिटेज समितीची मंजुरी आवश्यक असते. कार्यालयाच्या इमारतीमध्ये लिफ्टचे काम करण्यासाठी हेरिटेज समितीच्या परवानगीसाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

बातम्या आणखी आहेत...