आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा:दुसऱ्यांच्या घरात प्रकाश देणाऱ्याच्या जीवनात अंधार , कर्तव्यावर असतांना झाले जखमी : देताहेत मृत्यूशी झुंज

वर्धाएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

वादळी पावसामुळे वीजेच्या तारा कोसळले जात आहे. याच परिस्थितीत लाईनमन हा जीवाची पर्वा न करता कर्तव्य पार पाडत असतो. लाईट नसली तर करमत नाही. दुसऱ्यांच्या घरात सतत प्रकाश देणाऱ्याच्या जीवनात अंधार पडला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कर्तव्यावर असतांना विद्युत कर्मचारी जखमी झाला असून,तो आता मृत्यूशी झुंज देत आहे.

शहराजवळ असलेल्या ज्ञानेश्वर मगर म्हसाळा येथील ग्रामीण १ केंद्र, म्हसाळा येथील क्षेत्रात १५ मे रोजी रात्रीच्या सुमारास गारपीटसह वादळी पावसाने हजेरी लावली होती. या वादळाने अनेक  विद्युत पुरवठा खंडित झाला होता.मोठ्या प्रमाणात विजेचे तारे जमिनीवर कोसळले होते.अनेक घरात अंधार पडला होता. अनेकांची तक्रार येत असल्यामुळे सहाय्यक अभियंता वीरेंद्र कळसकर यांनी सदर सूचना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दिल्या. अभियंता कळसकर,लाईनमन चंद्रशेखर दुधनकर,काळे व गायकवाड यांना सोबत घेऊन खंडित झालेली विद्युत रोषणाई दुरुस्ती करण्यासाठी म्हसाळा परिसरात दाखल झाले होते. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देताच लाईनमन चंद्रशेखर दुधनकर (रा पाचगाव ता उमरेड जि नागपूर) हा कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही साहित्य जवळ न घेता, विद्युत खांबावर चढण्यास सांगितले, विजेच्या ताराचा जिवंत प्रवाह आल्याने कर्मचाऱ्याला विजेचा धक्का बसला या धक्यात तो जागीच जमिनीवर कोसळला असल्याने, या अपघातात तो गंभीर जखमी झाला.

या अवस्थेत त्याला नागपूर येथील रामदास पेठ परिसरात असलेल्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.या लागलेल्या विजेच्या धक्यामुळे त्याला हात गमवावे लागले आहेत. चंद्रशेखर हा घरात एकमेव कर्ता व्यक्ती होता,त्याच्या वृद्ध आई,पत्नी, एक ६ व एक २ वर्षाच्या दोन मुली असून,दिव्यांग बहिणीचा सुद्धा सांभाळत त्याला करावा लागत होता.

कधीही विद्युत रोषणाई खंडित झाली तर हा कर्मचारी दुसऱ्यांच्या घरात प्रकाश देत असायचा, मात्र या अपघातामुळे त्याच्या जीवनात अंधार पडला असल्यामुळे तो आता रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

कामगार संघटनेच्या एका शिष्टमंडळाने येथील अधीक्षक अभियंता वानखेडे यांची भेट घेऊन या प्रकरणातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच पीडित कर्मचाऱ्यांच्या घरातील सदस्यांना नौकरी  व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

 चौकशी सुरु करण्यात आली आहे

घडलेला प्रकार हा अंत्यत गंभीर आहे.चौकशी सुरु करण्यात आली असून,जखमी कर्मचाऱ्याच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. वीरेंद्र कळसकर सहाय्यक अभियंता, वर्धा

बातम्या आणखी आहेत...