आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Likes Books On Politics Including Narendra Modi In Gus's Bazaar; As The Allowance Was Distributed From 9 Am, The Members Turned To Shopping| Marathi News

उलाढाल:गस च्या बाजारातही नरेंद्र माेदींसह राजकारणावरील पुस्तकांना पसंती; सकाळी ९ पासून भत्ता वाटप झाल्याने खरेदीकडे वळले सदस्य

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भत्ता घरी घेऊन जावू नका असे ग्राहकांना थेट आवाहन करणारी बाजारपेठ म्हणून ग.स. साेसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी भरणारा स्टाॅलचा बाजार हाेय. काेराेनामुळे तीन वर्षांनंतर भरलेल्या या बाजारात साेसायटीच्या सदस्यांनी यंदा बदाम, काजू, सफरचंद, खाद्यपदार्थांसह टाॅवेल, कपबशा, चपला, टि-शर्ट यासारख्या जीवनाेपयाेगी वस्तुंपेक्षा बाैद्धीक खाद्य असलेल्या पुस्तकांना त्यातही पतंप्रधान नरेंद्र माेदी आणि राजकारणावरील पुस्तकांना पसंती दिली.

तब्बल ३०० पुस्तकांची विक्री अवघ्या काही तासात
गसची वार्षिक सभा आणि त्यात मिळणारा भत्ता ताे तेथेच खर्च करण्याचा गेल्या काही वर्षांपासूनचा प्रघात आहे. त्यामुळे दरवर्षी येथे विक्रीसाठी लागणाऱ्या स्टाॅलच्या वैविध्यात सातत्याने वाढ हाेते. यंदा काेराेनामुळे दाेन वर्षांपासून खंडीत झालेली बाजारपेठ लागली. दरवेळेपेक्षा स्टाॅलची संख्या व ग्राहक असलेल्या सदस्यांची संख्या कमीच हाेती. परंतु दीड वाजता असलेल्या सभेचा भत्ता देण्यासाठी सकाळी ९ वाजेपासून व्यवस्था करण्यात आली हाेती.
तेव्हापासूनच विविध वस्तू विक्रीचेही स्टाॅल लागले. महापालिकेने काेर्ट चाैकात साचणारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी खाेदकाम केल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी असताना त्यातून मार्ग काढत सदस्यांनी खरेदीचा आनंद लुटला.

तीनशे पुस्तकांची विक्री; पदवीधर मतदार नोंदणीच्या स्टॉल्सवर १८०० अर्ज प्राप्त
बाजारात दाेन स्टाॅल लावणारे प्रसाद बुक डेपाेचे संचालक प्रसाद वाणी यांनी पुस्तकांच्या विक्रीला नेहमीपेक्षा ६०% अधिक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. तब्बल ३०० पुस्तके विकली गेली. त्यात माेदींवरील पुस्तकांना अधिक मागणी हाेती. तर विविध राजकीय पुस्तकांची विक्री अधिक झाली.आगामी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी शुभांगी पाटील यांनी पदवीधर मतदार नाेंदणी करण्यासाठी स्टाॅल लावला हाेता. या स्टॉलवरून तीन हजारांवर अर्ज वितरीत झाले. तर १८०० अर्ज भरून प्राप्त झाल्याचे त्यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.

शिक्षक तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या व्हाइट बाेर्ड, रायटींग पॅड व उपयुक्त साहित्याची विक्री नेहमीप्रमाणेच झाल्याचे विक्रेते विजय बाविस्कर म्हणाले. अॅक्यूप्रेशर व तेल विक्रीचा स्टाॅल लालवेल्या उत्पादक सुभाष राणा यांनाही नेहमी एवढाच प्रतिसाद मिळाला. जळगाव शहरातील नवीपेठेत दिवसभर बसून दाेन पेट्या सफरचंद विक्री करणाऱ्या शकुंतला तायडे यांचे केवळ सहा तासात चार पेट्यांची विक्री झाली. चिकू, केळी या फळांची विक्रीही माेठ्या प्रमाणात झाली. तसेच दिवसभरात पाण्याच्या बाटल्यांची विक्रीही नेहमीपेक्षा दुपटीने झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...