आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुजाेरी:लिंकिंग : पाेटॅश, डीएपी, युरियासाठी‎ घ्यावी लागतात गरज नसलेली खते

प्रदीप राजपूत | जळगाव‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिकांसाठी पाेटॅश, डीएपी आणि‎ युरिया ही आवश्यक रासायनिक खते‎ घ्यायची असतील तर शेतकऱ्यांना या‎ खतांसाेबत बाेराॅन, नॅनाे युरिया,‎ मायक्राेन्युट्रियन्स आवश्यक नसलेली‎ उत्पादनेदेखील जबरदस्तीने विकत‎ घ्यावी लागत आहेत. जिल्ह्यात‎ सर्वाधिक मागणी असलेले पाेटॅश हे‎ खत देण्यासाठी रासायनिक खतांचे‎ विक्रेते तयार नाहीत. सरसकट ही‎ खते शिल्लक नसल्याचे सांगणारे‎ विक्रेते लिंकिंगची उत्पादने घेण्याची‎ तयारी दर्शवल्यास खते देण्यात तयार‎ हाेतात. याबाबत ‘दिव्य मराठी’च्या‎ प्रतिनिधीने शहरातील काही प्रमुख‎ खते विक्रेत्यांकडे जावून याबाबत‎ पडताळणी केली. त्यात हे‎ धक्कादायक वास्तव पुढे आले. त्याचे‎ पुरावे ‘दिव्य मराठी’कडे आहेत.‎ जिल्हाभरात रासायनिक खते‎ विक्रेत्यांकडून खतांवरील लिंकिंग‎ करूनच खते विक्री केली जात‎ आहेत.

अनावश्यक नसलेली खते‎ घेतल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड‎ बसत आहे. नामांकित कंपन्यांएेवजी‎ अनेक स्थानिक कंपन्यांची गुणवत्ता‎ नसलेली खते शेतकऱ्यांना घ्यावी‎ लागत आहेत. अनेक ठिकाणी बाेगस‎ पाेटॅश विक्री केले जात असल्याच्या‎ तक्रारी आहेत. कृषी विभाग मात्र‎ शेतकऱ्यांकडे पुराव्याची मागणी‎ करीत असल्याचे समेार येते आहे.‎

नकाे असलेली खते खरेदी करावी लागली
पाेटॅश घेण्यासाठी मला नकाे असलेली खतेही जबदरस्तीने‎ खरेदी करावी लागली. कृषी विभागाकडे याबाबत तक्रार‎ केली आहे. विक्रेते शेतकऱ्यांना पाेटॅश नाहीच म्हणून‎ सांगतात. लिंकिंगची खते घेतली तरच पाेटॅश मिळते.‎ - अनिल खडसे, शेतकरी, उमाळा, ता. जळगाव‎
‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎
मायक्राेन्युट्रियन्स घेतले‎ तरच मिळते पाेटॅश खत‎
नवी पेठेतील आणखी एका खत‎ विक्रेत्याकडे विचारणा केल्यावर त्याने‎ पाेटॅश शिल्लकच नसल्याचे सांगितले.‎ तीन पाेटॅश आणि दाेन डीएपीची मागणी‎ केल्यावर त्याने बायाे पाेटॅशची शिफारस‎ केली. बायाे पाेटॅश घेण्यास नकार देत‎ नियमित पाेटॅश हवा अशी मागणी‎ केल्यावर त्यांनी एका विशिष्ट कंपनीचे‎ ९०० रुपयांचे १० किलाे मायक्राेन्युट्रियन‎ घेतले तर पाेटॅश देण्याची तयारी दर्शवली.‎

आठवड्यात खतांचा नवीन रॅक येईल‎
विक्रेत्यांनी खतांची लिंकिंगद्वारे विक्री केल्याची लेखी‎ तक्रार शेतकऱ्यांनी केली पाहीजे. विक्रेत्यांवर तक्रारीशिवाय‎ कारवाई करता येत नाही. जिल्ह्यात सद्यस्थिीत पाेटॅशची‎ टंचाई नाही. या आठवड्यात नवीन रॅक येईल.‎ वैभव शिंदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद‎

गरज ३० हजारांच्या खतांची पण घ्यावी लागली ४५ हजारांची
‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीला पाेटॅश देण्यास नकार देणाऱ्या नवीपेठेतील खत विक्रेत्याने‎ उमाळा येथील शेतकरी अनिल खडसे यांना पाेटॅशची विक्री केली.परंतु त्यांना पाेटॅशसाेबत‎ अन्य नकाे असलेली खते जबरदस्तीने खरेदी करावी लागली. त्यांना ३० हजार रुपयांच्या‎ खतांची गरज असताना लिंकिंगमुळे प्रत्यक्षात ४५२७५ रुपयांची खते खरेदी करावी लागली.‎ सर्रास लूट केली जाते आहे. या संदर्भात त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे.‎

डीएपीवर बाेराॅनचे‎ पॅकेज सक्तीचे
शहरातील नवीपे ठेतील‎ असलेल्या एका नामांकित खते‎ विक्रेत्याकडे ‘दिव्य मराठी ’च्या‎ प्रतिनिधीने खतांची चाैकशी‎ केली. त्यात, पाेटॅश एेवजी‎ पाॅलिल्फेट हे खत घ्यावे‎ लागेल. डीएपीच्या दाेन बॅगवर‎ अडीचशे रुपयांचे एक बाेराॅनची‎ पिशवी घ्यावी लागेल. दाेन‎ युरियाच्या पिशव्यांवर एक नॅनाे‎ युरियाची बाॅटल घ्यावी लागेल.‎ सध्या पांढरे पाेटॅश उपलब्ध‎ नाही. दाेन दिवसांनी लाल‎ पाेटॅश येईल ते घ्यावे लागेल‎ असे या दुकानात काउंटरवर‎ बसलेल्या व्यक्तीने सांगितले.‎ डीएपी साेबत सक्तीचे बाेराॅन‎ घेण्यास नकार दिल्यावर‎ आतापर्यंत एका पिशवीवर एक‎ बाेराॅन देत हाेताे, आता तरी दाेन‎ पिशव्यांवर एकच पिशवी घ्यावी‎ लागते आहे, असे त्यांनी‎ सांगितले. शिवाय बाेराॅन नकाे‎ असेल तर साेबत नॅनाे युरिया‎ घेवू शकता अशी आॅफर या‎ विक्रेत्याकडून देण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...