आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनातून चळवळीला बळ:साहित्यिक जयसिंग वाघ यांनी बैठकीत मांडले मत

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धम्म चळवळ अधिक गतिमान करणे, बुद्ध विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, पाली भाषेचा प्रचार-प्रसार करणे यासाठी बौद्ध साहित्य संमेलन सातत्याने घेत राहणे आवश्यक असल्याचे मत साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी तिसऱ्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत व्यक्त केले. जानेवारी २०२३मध्ये जळगावात हाेणाऱ्या तिसऱ्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलताना साहित्यिक वाघ बोलत होते. प्रा. भरत शिरसाठ यांनी साहित्य संमेलनाबाबत माहिती दिली. या बैठकीत साहित्य संमेलनासाठी विविध शाखा स्थापन करण्यात आल्या. सुरेश सुरवाडे, धनराज मोतीराय आदींनी या बैठकीत मार्गदर्शन केले. पदाधिकाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...