आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद:रूममध्ये तब्बल दोन महिने वास्तव्य; हॉटेल महिंद्रामध्ये मुक्काम ठोकून फसवणूक करणाऱ्यास केले जेरबंद

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा चौफुली येथील हॉटेल महिंद्रा येथील रूममध्ये तब्बल दोन महिने वास्तव्य केले. या वेळेत मद्य, मटणावर ताव मारला. शेवटी हॉटेलचे १ लाख ८९ हजार ९५० रुपयांचे बिल न देता ग्राहकाने पलायन केल्याचा प्रकार मे महिन्यात घडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी संशयितास अटक केली.

मयूर अशोक जाधव (रा. फ्लॅट नं. ०४, श्रीगणेश आर्किड, गंगापूररोड, रामेश्वरनगर, आनंद वल्ली, नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मयूर याने याने पुण्यातील एका कंपनीत मॅनेजर आहे, अशी बतावणी करत हॉटेलातील एका खोलीत वास्तव्य केले. १६ एप्रिल रोजी मयूर जाधव हा हॉटेलातील खोलीची चाबी सोबत घेऊन जात पसार झाला. हॉटेलमालक तजेंद्रसिंग अमितसिंग महिंद्रा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयूरच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मयूर पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक फौजदार अतुल वंजारी, श्रीराम बोरसे, इम्रान सय्यद व सचिन पाटील यांच्या पथकाने त्याला हिंजेवाडी परिसरातून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याने फसवणुकीची रक्कम परत केली. न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी महिंद्रा यांना पैसे देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...