आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाची चाहूल लागल्याने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू झाली आहे; परंतु थकीत कर्जामुळे हैराण झालेले शेतकरी टाेकाची भूमिका घेतात. त्यांना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे. त्यांच्या कर्जाची एकरकमी परतफेड किंवा कर्ज नूतनीकरण करण्यात येणार आहे. शेतकरी संवेदना अभियान याच उद्देशाने राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांना सोबत घेऊन १ ते ५ जून दरम्यान तालुका व गाव पातळीवर बँक समाधान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा लाभ जिल्ह्यातील ८५ ते ९० हजार शेतकऱ्यांना होण्याची अपेक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध होण्यासाठी अडचणीतील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ‘शेतकरी संवेदना अभियान’ राबवले जात आहे. यात शेतकऱ्यांना वित्त पुरवठा सुरळीतपणे करणे अभिप्रेत आहे. त्यासाठी १ जूनपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तसेच मोठ्या गावांत ‘बँक समाधन मेळावे’ घेण्यात येत आहेत. या मेळाव्यांत शेतकऱ्यांना वित्त पुरवठ्याबाबत माहिती देणे, थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना एक रकमी परत फेड योजना (आेटीएस) किंवा कर्जाचे नूतनीकरण आदी पर्याय सहज उपबलब्ध करून पुन्हा नवीन कर्जासाठी मदत केली जाणार आहे.
या बँकांना सोबत घेऊन राबवणार उपक्रम कर्जफेड करण्यासाठी जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने मागवली आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्वच राष्ट्रीयीकृत बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडाेदा, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, एचडीएफसी या प्रमुख बँकांना सोबत घेऊन हा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यात किमान ८५ ते ९० हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होऊन ७ जूनपूर्वी शेतकऱ्यांना नवीन हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना वित्त पुरवठा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. जेणेकरून अवाजवी, सावकारी व्याजाचे कर्ज घेण्यापासून शेतकरी वाचू शकतील अशी आशा प्रशासनाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.