आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल:जळगावमध्ये मध्यरात्री दोघांनी गळा दाबून एसटी कर्मचाऱ्याचा मोबईल, पैसे लुटले

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यरात्री ड्युटीवरुन घरी जात असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याचा दोन भामट्यांनी अडवले. त्यांचा गळा दाबुन 10 हजार रुपयांची रोकड व दीड हजार रुपयांचा मोबाइल हिसकाऊन पोबारा केला. तीन जुन रोजी मध्यरात्री 1.30 वाजता शिवाजीनगरातील ख्रिश्चन दफनभूमीजवळ ही घटना घडली. तर पाच रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

वाल्मिक उत्तम मोरे (वय 43, रा. शिवाजीनगर) यांची लुट झाली आहे. मोरे हे एसटी महामंडळात लिपीक पदावर नोकरीस आहेत. तीन रोजी मध्यरात्री ते पायी घराकडे जात होते. यावेळी ख्रिश्‍चन दफनभूमीजवळून जात असतांना त्यांच्या समोरुन दोन भामटे आले. त्यांच्यातील एकाने मोरे यांचा गळा दाबून धरला तर दुसऱ्याने मागून येवून त्यांचे हात घट्ट पकडून ठेवले. नंतर एकाने मोरे यांच्या खिशातील दहा हजार रुपयांची रोकड व मोबाइल घेत दोघांनी पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मोरे प्रचंड भेदरले होते. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. घटनेनंतर ते धावतच घरी पोहोचले. यांनतर दुसऱ्या दिवशी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन अनोळखी भामट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर ठाकरे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...