आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवे मारण्याची धमकी:प्रेमविवाह केल्याचा राग, नातेवाईकांकडून दाम्पत्यास सळईने मारहाण

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमविवाह का केला? असा जाब विचारत रागत आलेल्या नातेवाईकांच्या जमावाने दाम्पत्यास लोखंडी सळईने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. 20 रोजी घडलेलया या घटनेचा गुन्हा बुधवारी पहाटे दाखल करण्यात आला.

उषाबाई रोहिदास सोनवणे (वय 28, रा. राजीव गांधाी नगर, पारोळा) यांनी नुकताच रोहिदास सोनवणे यांच्याशी प्रेमविवाह केला. याचा राग आल्यामुळे उषाबाईच्या नातेवाईकांनी तीच्या घरी धाव घेतली. उषाबाईसह तीचे पती रोहिदास सोनवणे यांना लोखंडी सळईने मारहाण केली. यात त्यांच्या डोक्यावर, डोळ्यावर गंभीर दुखातप झाली. वीट मारून उषाबाई यांच्या डाव्या हातचे मनगट फ्रॅक्चर केले. त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून नुकसान केले.

तसेच रोहिदास सोनवणे यांना जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी उषाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिलीप उत्तम सरदार, महेंद्र उत्तम सरदार, विनोद उत्तम सरदार, मुकेश दिलीप सरदार, संगीताबाई दिलीप सरदार, अर्जनाबाई बाला सरदार, सायत्रीबाई छोटु महाले, सागर छोटु महाले (सर्व रा. मेहेटेहु, ता. पारोळा) यांच्या विरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार बापु पाटील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...