आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज आकडा काढला, घरमालक संतापला:महावितरण कर्मचाऱ्याला मारत सुटला! व्हिडीओ व्हायरल, घटनेमुळे प्रचंड दहशत

ऐरंडोल3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज चोरी प्रकरणात कारवाईसाठी आलेल्या महावितरणच्या पथकाला गावात मोठ्या दांडक्याने मारहाण केली. आकडा काढला म्हणून घरमालक संतापला आणि याच आवेशात त्याने बेदम मारहाण केली. ही गंभीर घटना पिंपळकोठा विभागात जवखेडा गावात घडली. यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने मारहाण केली जात असल्याने जळगावात खळबळही माजली आहे. या घटनेतील जखमी कर्मचाऱ्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आकडा काढला म्हणून बेदम मारहाण

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील पिंपळकोठा विभागात जवखेडा गावात मंगळवारी सकाळी महावितरणचे अभियंता इच्छानंद पाटील, जनमित्र अक्षय महाजन, पंकज येवले, सुनील महाजन यांचे पथक वीजचोरी रोखण्यासाठी गेले होते. या गावात मनोज प्रताप पाटील हा वीजतारांवर आकडा टाकून वीजचोरी करत असल्याचे पथकाला आढळून आले.

पथकाने हा आकडा काढून टाकल्याने मनोज पाटीलला राग आला. रागाच्या भरात त्याने लाकडी दांडक्याने पथकावर हल्ला चढवला. या मारहाणीत अक्षय महाजन हे जखमी झाले आहेत. जखमी अक्षय महाजन यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

त्याने कुटुंबाचेही ऐकले नाही

गावात मनोज पाटील यांचा आकडा काढल्यानंतर ते संतप्त झाले. त्यांनी वीज कर्मचारी अक्षय महाजन यांच्यावर मोठ्या दांडक्याने आघात केला. यानंतर ते कर्मचाऱ्याच्या मागेच लागले. त्यांना रोखण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती पुढे सरसावली. पण, त्यांनाही मनोज पाटील जुमानत नव्हते. हातातील भल्या मोठ्या दांडक्याने वीज कर्मचाऱ्याला बेदम मारहाण चालूच होती. समजूत काढल्यानंतरही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

पोलिस ठाण्यात गुन्हा

या प्रकरणी जखमी वीज कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली असल्याचं पाहायला मिळत असून मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वीज कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

जबाबानंतर गुन्हा दाखल होणार

वीजचोरीमुळे जळगावात मोठे नुकसानदरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीजचोरी सुरु आहे. जळगाव शहरातील महाबळ परिसरातील समतानगर या भागात शेकडो घरांमध्ये वीजचोरी सुरू आहे. वीजतारांवर आकोडे टाकून लोक सर्रासपणे चोरी करीत आहेत. अशीच स्थित पिंप्राळा हुडको, शिवाजीनगर हडको या भागात आहे. लोकांच्या या वीजचोरीमुळे या परिसरांना लागुन असलेल्या नागरीकांनाही त्रास होतो आहे. जे नागरीक नियमितपणे वीजबील भरत आहेत, परंतु ते वीजचोरी होत असलेल्या परिसरांच्या शेजारी राहतात, त्यांना मोठ्या प्रमाणात लोडशेडींगला सामोरे जावे लागते आहे.

मीटर शिल्लक नसल्याचेही कारण

महावितरणकडे वीजमीटरच्या मागण्यांचे शेकडो अर्ज पडून आहेत. शासनाकडे मीटर शिल्लक नसल्यामुळे वीजचोरी होते आहे. वीजचोरी करणारे देखील वीजमीटरची मागणी केली असून मीटर मिळत नाही असे कारण पुढे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...