आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्ती अर्ज:महाडीबीटी;  शिष्यवृत्ती अर्जासाठी २५ पर्यंत मुदत

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू झाले आहे. या पोर्टलवर नवीन अथवा रिप्लाय करण्यासाठी २५ ऑगस्ट अंतिम मुदत आहे. या मुदतीत अर्ज पोर्टलवर स्वीकारले जातील. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.

अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये व त्या महाविद्यालयात शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू आहे. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती प्रवर्गाचे शिष्यवृत्ती अर्ज भरावे. विद्यार्थ्यांनी अर्ज अचूक भरून मंजुरीसाठी समाजकल्याण कार्यालयात ऑनलाइन फॉरवर्ड करावयाचे आहेत. दिलेल्या मुदतीनंतर महाविद्यालयस्तरावर अथवा विद्यार्थी लॉगिंवर अर्ज प्रलंबित राहिल्यास त्याची जबाबदारी प्राचार्यांची राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...