आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाळधी येथील मणियार इस्टेटमध्ये भारतातील सर्वांत उंच असलेल्या ३१ फूट श्री सिद्धी महागणपती प्राणप्रतिष्ठेचा १६ दिवसांच्या उत्सवास मंगळवारपासून सुरुवात होत आहे. महाेत्सवात दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ८ वाजता नित्य अर्चना, दुपारी ४ वाजता अथर्वशीर्ष पठण, सायंकाळी ६ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी प्रायश्चित्त संकल्प, नान्दीश्राद्ध, अभिषेक, यासह गणपती मातृका पूजन, दशविधी स्नान, हवन नित्य आराधना, जलयात्रा व दुपारी ४ वाजता मंडप प्रवेश हे धार्मिक विधी होणार आहेत.
साेमवारी किशनगढ, पुष्कर, चित्रकूट, प्रयागराज, जयपूर आदी तीर्थक्षेत्रावरून पंडित दाखल झाले आहेत. आहुतीसाठी चर्तुककुंड, इंद्रकुंड, योनीकुंड, चापकुंड, त्रिकोण कुंड, वर्तुळ कुंड, अष्टकुंड, पदमकुंड, रुद्रकुंड या नऊ प्रकारचे कुंड तयार करण्यात आले आहे. यज्ञा बरोबरच सहस्र मोदक, फुले, अत्तर, दूध दहीचा अभिषेक, मिठाईचा अभिषेक केला जाणार आहे. यासाठी भाविकांच्या सोयीसाठी आकाशवाणी चौकातील सिद्धि व्यंकटेश मंदिरापासून माेफत वाहनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.