आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राँझ पदक‎:महाराष्ट्राने पश्चिम बंगाल संघाला‎ पराभूत; महाराष्ट्र संघाला मुलींच्या‎ रग्बी स्पर्धेत ब्राँझ पदक‎

जळगाव‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलींच्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत‎ महाराष्ट्राने पश्चिम बंगाल संघाला‎ पराभूत करीत ब्राँझ पदक प्राप्त केले.‎ ही स्पर्धा १९ जून रोजी घेण्यात‎ आली. महाराष्ट्र संघात जळगाव‎ जिल्हा रग्बी असोसिएशनची‎ खेळाडू श्रुती दिनेश महाजन हिचा‎ समावेश होता.‎

मुलींच्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत‎ सर्वाच आघाड्यांवर श्रुतीने उत्कृष्ट‎ कामगिरी करत संघाला मोलाची‎ साथ दिली. या यशाबद्दल जळगाव‎ रग्बी संघटनेचे सचिव प्रा. अतुल‎ गोरडे यांनी श्रुती व महाराष्ट्र संघाचे‎ कौतुक केले. श्रुतीच्या राष्ट्रीय‎ पातळीवर पोहोचण्याच्या प्रवासात‎ प्रा. उमेश पाटील, कृष्णा कुमावत,‎ हर्षद परदेशी यांनी सहकार्य केले.‎ मुलींच्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत ब्राँझ पदक विजेता महाराष्ट्राचा संघ

बातम्या आणखी आहेत...